Toyota चा ग्राहकांना झटका!! गाड्यांच्या किंमतीत मोठी वाढ

टाइम्स मराठी । टोयोटा ही भारतातातील एक प्रमुख कार कंपन्यांपैकी एक आहे. टोयोटा कंपनीचा ग्राहक वर्गही देशात मोठा आहे. अशातच टोयोटा किर्लोस्कर मोटर इंडियाने भारतासाठी आपल्या यूव्ही आणि पूर्ण कारांच्या लाइनअप रेंजच्या किमतीत वाढ करत ग्राहकांना धक्का दिला आहे. प्रत्येक मॉडेलच्या नवीन दरांबाबतची माहिती सध्या कंपनी ने जाहीर केलेली नाही. परंतु ह्या वाढणाऱ्या किमती पाहून ग्राहक आणि चाहता वर्ग नक्कीच नाराज होऊ शकतो. टोयोटा गाड्यांच्या वाढलेल्या नव्या किमती 5 जुलै 2023 पासून लागू झाली आहेत. चालू वित्त वर्षात कंपनीने दुसऱ्या वेळा आपल्या गाड्यांच्या किमतीत वाढ केली आहे.

   

गाड्यांच्या दरवाढीचे नेमकं कारण काय?

गाड्यांचा किंमतीत नेमकी वाढ का झाली याबाबत माहिती देताना कंपनीने म्हंटल कि, किंमत वाढ होण्याचे कारण म्हणजे इनपुट कॉस्ट मध्ये होणारी वाढ. इनपुट कॉस्टमुळे किंमत वाढ जरी होत असली तरी कंपनी ने एक विधान केले आहे की इनपुट कॉस्ट मध्ये होणारी वाढ ग्राहकांवर कमीत कमी प्रमाणावर पडेल असेही कंपनीने म्हंटल आहे.

किंमतीत किती प्रमाणात वाढ –

टोयोटाच्या इनोवा हाईक्रॉस जी कंपनीची सर्वाधिक मागणी आणि पसंतीची असलेल्या कारची किंमत 18.35 लाख रुपयांवरून18.52 लाख रुपये झाली आहे.अर्बन क्रूजर हाईराइडर या कार च्या किमतीत देखील वाढ झाली आहे. कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय एसयूवी फॉर्च्यूनरची सुरुवाती किंमत 32.99 लाख रुपये झाली आहे. एका अनुमानानुसार, कंपनीने आधीच सर्व कारांच्या किंमतींमध्ये 1.5 ते 2 टक्के वाढ केलेली आहे. या वाढ झालेल्या किंमतीमुळे टोयाटो कंपनी च्या कार प्रेमींना नक्कीच जास्तीचा पैसे मोजावे लागतील हे मात्र नक्की .

टोयोटा कोणकोणत्या गाड्यांची विक्री करते?

टोयोटा इंडिया सध्या भारतात अर्बन क्रूजर हाईराइडर, ग्लैंजा, इनोवा क्रिस्टा, इनोवा हाईक्रॉस, फॉर्च्यूनर, फॉर्च्यूनर लेजेंडर, कैमरी आणि वेलफायर अशा प्रकारच्या लोकप्रिय गाड्यांची विक्री करते. जून 2023 मध्ये कंपनीने 19,608 युनिट विक्री केली आहेत, ही विक्री जून 2022 पेक्षा 19 टक्के जास्त आहेत. ग्राहकांची आवड आणि प्रतिसाद लक्षात घेता कंपनी आता ग्राहकांसाठी एक नवीन एसयूव्ही कूप, एक नवीन 7 सीटर एसयूव्ही आणि एक अपडेटेड टोयोटा फॉर्च्यूनर लॉन्च करण्याची तयारी करीत आहे.