Toyota Innova Hycross GX Limited Edition लाँच; जाणून घ्या किंमत 

Toyota Innova Hycross GX Limited Edition : Toyota कंपनीचे वाहन भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. आता कंपनीने नवीन पेट्रोल GX वेरियंटवर बेस्ड असलेली इनोवा हायक्रॉस चे नवीन लिमिटेड एडिशन मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने या मॉडेलमध्ये एक्स्टेरियल आणि इंटरियर दोन्ही मध्ये कॉस्मेटिक बदल केले आहे. यासोबतच  यामध्ये बरेच अपडेट आणि फीचर्स देण्यात आले आहे. हे नवीन मॉडेल लॉन्च करत नॉन हायब्रीड व्हेरिएंटला जास्त आकर्षित करणे हा टोयोटा कंपनीचा खास उद्देश आहे. कंपनीने या नवीन लिमिटेड एडिशन मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.7 लाख रुपये ते 20.22 लाख रुपये एवढी ठेवली आहे. या मॉडेलच्या स्टॅंडर्ड  GX व्हेरिएंटची किंमत 40,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. जाणून घेऊया या नवीन मॉडेल चे  फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

एक्स्टेरियल- Toyota Innova Hycross GX Limited Edition

Toyota Innova Hycross GX Limited Edition या मॉडेलच्या एक्स्टर्नल साईडने बरेच बदल करण्यात आले आहे. त्यानुसार कारच्या ग्रील वर नवीन क्रोम गार्निश देण्यात आले असून  फ्रंट आणि रियर बंपर वर नवीन फॉक्स सिल्वर स्किड प्लेट वापरण्यात आली आहे. यामध्ये प्लॅटिनम व्हाईट एक्स्टेरियल पेंट शेड साठी 9,500 रुपये अतिरिक्त खर्च करावे लागू शकतात.

इंटेरियर

Toyota Innova Hycross GX Limited Edition या मॉडेलच्या इंटेरियर मध्ये बरेच  महत्वाचे अपडेट देण्यात आले आहे. त्यानुसार यामध्ये डॅशबोर्ड आणि डोर ट्रिम्स साठी एक नवीन सॉफ्ट टच, चेस्टनट ब्राऊन फिनिश  मिळते. रेगुलर GX ट्रिम मध्ये काळ्या प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. विंडो कंट्रोलच्या चारही साईडने कंपनीने नवीन फॉक्स वूड ट्रिम वापरला आहे. या मॉडेलच्या फॅब्रिक सीट कव्हर मध्ये नवीन ड्युअल टोन ब्लॅक आणि ब्राऊन फिनिशिंग मिळते. GX लिमिटेड एडिशन व्हेरिएंट मध्ये 7 सीटर आणि 8 सीटर कॉन्फिगरेशन दोन्ही मध्ये हे बदल उपलब्ध आहे.

पावरट्रेन

Toyota Innova Hycross GX Limited Edition मॉडेल मध्ये  2.0 लिटर नॅचरली ऍस्पिरिटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये जास्त फ्युल एफिशियंट हायब्रीड पावरट्रेन मिळत नाही. हे इंजिन CVT गिअर बॉक्स ने सुसज्ज असून अप्रतिम मायलेज देते. या मॉडेलमध्ये देण्यात आलेली पावरट्रेन 172 hp पावर आणि 205 nm पिक टॉर्क जनरेट करते. तुम्ही हे मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर बुक करू शकतात. कारण हे मॉडेल फक्त डिसेंबर पर्यंत किंवा स्टॉक एंडिंग पर्यंत उपलब्ध राहणार आहे.