TIMES MARATHI | सध्या टोयोटा किर्लोस्कर मोटर दोन नवीन सात सीटर फॅमिली एसयुव्ही लॉन्च करण्याची तयारी करत आहे. यापैकी पहिली SUV टोयोटा करोला क्रॉस ही आहे. आणि दुसरी एसयूव्ही टोयोटा फॉर्च्यूनर ही असणार आहे. या दोन्ही एसयूव्हीमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. टोयोटा करोला क्रॉसला कंपनीने नव्याने डेव्हलप केले आहे. आणि टोयोटा फॉर्च्यूनर ही नवीन पिढीच्या हिशोबाने डिझाईन करण्यात आली आहे. या टोयोटा फॉर्च्यूनरमध्ये बरेच बदल करण्यात येणार आहे. जाणून घेऊया या दोन्ही एसयूव्हीचे फीचर्स.
नवीन टोयोटा कोरोला क्रॉस SUV
टोयोटा लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये कोरोला क्रॉस यावर बेस्ड नवीन SUV आणण्याची तयारी करत आहे. ही टोयोटा कंपनीची फेमस एमपीव्ही, इनोवा हाय क्रॉस, टीएनजी एसी प्लॅटफॉर्म आणि पावरने सुसज्ज असेल. ही नवीन टोयोटा करोला क्रॉस ह्युंदाई टक्सन आणि जीप मेरिडियन यासारख्या कारला टक्कर देऊ शकते.यापूर्वी असलेली टोयोटा कोरोला क्रॉस यामध्ये पाच सीट आणि 440 लिटर बूट स्पेस उपलब्ध होती. परंतु आता नवीन टोयोटा कोरोला क्रॉस ही SUV 7 सीटर असणार आहे.
नवीन टोयोटा कोरोला क्रॉस SUV यामध्ये 2.0 L पेट्रोल आणि 2.0 लिटर स्ट्रॉंग हायब्रीड पावरट्रेन मिळू शकते. हे इंजिन 184 bhp वर 206 पीक टॉर्क जनरेट करते. या एसयूव्ही मध्ये 2640 mm व्हील बेस देण्यात आले आहे. त्याचबरोबर या एसयूव्हीमध्ये सर्वात जास्त केबिन स्पेस देण्यात येणार आहे. आणि हाय क्रॉस या कार प्रमाणे यात फ्लॅट फोल्ड तिसऱ्या लेयर मध्ये सीट आणि एक विद्युत टेलगेट देखील मिळू शकतो.
नवीन टोयोटा फॉर्च्यूनर
ही नेक्स्ट जनरेशन कार असणार आहे. यामध्ये बरेच बदल करण्यात येणार असून ही जुन्या टोयोटा फॉर्च्यूनर पेक्षा प्रचंड वेगळी असेल. यामध्ये नवीन प्लॅटफॉर्म, आकर्षक डिझाईन, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, माइल्ड हायब्रीड पावर ट्रेन, देण्यात येणार आहे. ही नवीन जनरेशन टोयोटा फॉर्च्यूनर 7 सीटर एसयूव्ही असेल.या नेक्स्ट जनरेशन एसयूव्ही मध्ये टैकोमा पिकअप ट्रक डिझाईन देण्यात येऊ शकतो. ही डिझाईन TNGA -F आर्किटेक्चर वर आधारित असून यामध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये ADAS, हायड्रोलिक स्टिअरिंग व्हील देण्यात येऊ शकतात.
नवीन टोयोटा फॉर्च्यूनर मध्ये 1GD FTV 2.8 L डिझेल इंजिन देण्यात येणार आहे. यामध्ये माइल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजी आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम देखील उपलब्ध असेल. टोयोटा फॉर्च्यूनरच्या जुन्या मॉडेलमध्ये उपलब्ध असलेल्या मायलेज पेक्षाही जास्त मायलेज या एसयूव्हीचे असेल. ही नेक्स्ट जनरेशन टोयोटा फॉर्च्यूनर एमजी ग्लोस्टर यासारख्या एसयूव्हीसोबत प्रति स्पर्धा करेल. ही नवीन टोयोटा फॉर्च्यूनर 2024 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.