Toyota Land Hopper : Toyota लाँच करणार नवी Electric SUV; मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी टोयोटा कंपनीने Land Cruiser Prado ही गाडी लॉन्च केली होती. त्यानंतर आता टोयोटा कंपनीने छोटी ऑफ रोड SUV लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. टोयोटा लँड हॉपर असं या गाडीचे नाव असून ती Land Cruiser Prado आणि Land Cruiser 300 सोबतच लाँच होण्याची शक्यता आहे. याबाबत सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी याच वर्षी टोक्यो मध्ये ही SUV लॉन्च होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, ही अपकमिंग SUV बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या नावांनी उपलब्ध करण्यात येणार आहे. म्हणजेच ज्या प्रकारे Land Cruiser ही उत्तर अमेरिकेमध्ये Land Cruiser 250 या नावाने ओळखली जाते. त्याच प्रकारे ही अपकमिंग SUV जपानमध्ये Land Hopper या नावाने लॉन्च करण्यात येईल. ऑगस्ट महिन्यामध्ये टोयोटाने जपानी पेटंट कार्यालयासह नाव ट्रेडमार्क केले होते.

   

Land Cruiser Prado या एसयूव्हीच्या कार्यक्रमांमध्ये टोयोटाचे प्रमुख साईमन हम्फ्रीज यांनी सांगितले की, लँड क्रूझर ब्रँड अधिक परवडणारा असावा असं ग्राहकांना वाटतं. त्यानुसार अपकमिंग SUV सह टोयोटा ऑटोमोबाईल बाजारपेठेमध्ये वेगळ्या नावासह मॉडेल लॉन्च करेल. त्यानुसार टोयोटा अपकमिंग कॉम्पॅक्ट क्रुझरला EV मॉडेल मध्ये लॉन्च करू शकते. नुकताच कंपनीने लॉन्च केलेल्या टीजर व्हिडिओ मधून या मॉडेलची माहिती मिळत आहे. त्यानुसार Toyota Land Hopper हे एक इलेक्ट्रिक मॉडेल असेल असं वाटत आहे.

Toyota Land Hopper मध्ये काय खास असेल –

या टीजर व्हिडिओ नुसार Toyota Land Hopper ही SUV एक बॉक्सि आणि अपराईट डिझाईन मध्ये उपलब्ध होईल. या SUV मध्ये समोरच्या साईडने सी शेप लाईट सिग्नेचर दिसू शकते. Toyota Land Hopper चा आकार कोरोला क्रॉस यासारखा असेल. आणि ही गाडी 4.4 मीटर एवढी लांब असेल. त्याचबरोबर या टीझर व्हिडिओमध्ये टेलगेटवर एक एक्स्ट्रा व्हील दिसत आहे. या SUV बाबत आणखीन माहिती मिळाली नसून या वर्षाच्या अखेरीस ही लॉन्च होईल.