टाइम्स मराठी । (Toyota MPV Vellfire) भारतातील प्रमुख कार कंपन्यांपैकी एक म्हणजे टोयोटा किर्लोस्कर मोटर. या कंपनीचा देशामध्ये खूप मोठा ग्राहक वर्ग आहे. आता भारतीय बाजारात या कंपनीने नवीन टोयोटा MPV वेलफायर ही कार तीन व्हेरियंट मध्ये लॉन्च केली आहे. ही लक्झरी कार MPV मॉडेल लाईनअप, दोन ग्रेड, हाय ग्रेड आणि VIP ग्रेड एक्झिक्युटिव्ह लाउन्स मध्ये उपलब्ध असेल. या तिन्ही व्हेरियंट ची किंमत वेगवेगळी देण्यात आलेली आहे. टोयोटाची ही लक्झरी एक्स्टर्नली जेट ब्लॅक, प्लॅटिनम पर्ल व्हाईट, आणि प्रेषियस मेटल या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.
लूक आणि डिझाईन –
टोयोटा एमपीवी वेलफायरची (Toyota MPV Vellfire) लांबी 4995 mm, रुंदी 1850mm, उंची 1950 mm देण्यात आली आहे. यासोबतच व्हीलबेस 3000mm एवढी आहे. टोयोटा MPV वेलफायर च्या डिझाईन आणि डायमेन्शन बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये फोर्स फुल इम्पॅक्ट लक्झरी लैंग्वेज देण्यात आली असून ती मॉड्युलर टीएनजीए प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आली आहे. त्याचबरोबर यामध्ये सहा स्लैट ग्रील देण्यात आलेल्या असून याला स्प्लिट हेडलँप, एलइडी डीआरएल आणि हेड लॅम्प जोडण्यासाठी फ्रंट बंपर वर एक यु आकाराची क्रोम पट्टी देण्यात आली आहे.
टोयोटा एमपीवी वेलफायरच्या केबिनमध्ये बरेच बदल करण्यात आलेले असून यामध्ये 15 जेबीएल स्पीकर अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले कनेक्टिव्हिटी सह 14 इंच इन्फॉटेनमेंट सिस्टीम देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह लाऊंज मध्ये 14 इंच रियल एंटरटेनमेंट सिस्टीम, सेकंड रो साठी दोन कॅप्टन चेअर्स आणि रिट्रेक्टेबल टेबल, व्हेंटिलेशन आणि हीटिंग फीचर्स देखील यामध्ये देण्यात आले आहे. टोयोटा एमपीवी वेलफायर मध्ये क्रोम आउटलाइनसह ब्लॅक कलर चे पिलर, मागच्या साईडने वेलफायर बैजिंग आणि व्ही आकाराच्या टेललैप्स प्रीमियम देण्यात आलेले आहेत.
इंजिन – (Toyota MPV Vellfire)
टोयोटा एमपीवी वेलफायर यामध्ये पावरट्रेन सेटअप देण्यात आलेला असून यामध्ये 2.5 लिटर ४ सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजन 250Bhp पॉवर जनरेट करते. त्याचबरोबर 8 स्पीड इलेक्ट्रिक सीव्हीटी गिअर बॉक्स देण्यात आलेला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार टोयोटा एमपीवी वेलफायर हाईब्रिड मोड वर 40% अंतर कापू शकते. त्याचबरोबर ही कार एका लिटर मध्ये 19.2 किलोमीटर पर्यंत रेंज देते.
किंमत किती?
टोयोटा एमपीवी वेलफायर च्या तीनही व्हेरियंटची किंमत वेगवेगळी आहे यामधील लाईनअप दो ग्रेड या व्हेरियंट ची किंमत 1 कोटी 19 लाख 90,000 रुपये, हाय ग्रेड आणि VIP ग्रेड व्हेरियंटची किंमत 1 कोटी 29 लाख 90,000 रुपये एवढी असून ही टोयोटा एमपीवी वेलफायर मर्सिडीज वी क्लास सोबत प्रतिस्पर्धा करेल.