1 लाख रुपयांपर्यंत 7 सीटर गाडी खरेदी करायची आहे? Toyota ची ‘ही’ Car तुमच्यासाठी ठरेल बेस्ट

टाइम्स मराठी । भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सध्या 7 सीटर SUV ची मोठी चलती आहे. मोठ्या कुटुंबासाठी आणि ज्या ग्राहकांना आरामदायी प्रवास  करणे आवडते,  त्यांच्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या 7 सीटर SUV उपलब्ध आहेत. परंतु या 7 सीटर कार ची किंमत देखील जास्त असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना या किमती परवडत नाही. परंतु तुम्ही बजेटमध्ये अप्रतिम फीचर्सने सुसज्ज असलेली 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज Toyota या ब्रँडच्या 7 सीटर कार बद्दल सांगणार आहोत. जी फक्त 1 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आम्ही बोलतोय Toyota Rumion CNG या कार बद्दल. मोठ्या फॅमिली साठी ही कार अप्रतिम आहे. आज आपण जाणून घेऊया या कारचे फीचर्स.

   

पावर ट्रेन

Toyota Rumion CNG या कारमध्ये चार सिलेंडर  इंजिन देण्यात आले आहे. हे 1462 CC इंजिन असून 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सह उपलब्ध आहे. हे इंजिन 5500 RPM वर  86.63 BHP पावर आणि 4200 RPM वर 121.5 NM पीक टॉर्क जनरेट करते. ही CNG कार प्रति किलो 26 किलोमीटर एवढे मायलेज देते. म्हणजेच तुम्ही या CNG कार मध्ये 1 किलो सीएनजी गॅस भरल्यास  26 km पर्यंत प्रवास करू शकतात.

फिचर्स

Toyota Rumion CNG या कारमध्ये 2 एअरबॅग देण्यात आले आहेत. या कारमध्ये देण्यात आलेल्या ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचं झालं तर, यात अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स (EBS), ब्रेक असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल  देण्यात आले आहे. यासोबतच  स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल, व्हॉइस कमांड, ब्लूटूथ कॉम्पॅबिलिटी, TFT डिस्प्ले यासारखे बरेच फीचर्स यामध्ये उपलब्ध आहे.

किंमत

Toyota च्या या SUV ची एक्स शोरूम किंमत 11.24 लाख रुपये आहे. आणि ऑन रोड किंमत 13 लाख 01 हजार 761 आहे. परंतु तुम्ही फायनान्सच्या माध्यमातून फक्त 1 लाख रुपये डाऊन पेमेंट भरून ही कार खरेदी करू शकतात. त्यानुसार तुम्हाला 9.8% वार्षिक व्याजदरानुसार 25,416 रुपये 5 महिन्यासाठी भरावे लागतील.