Toyota लवकरच लाँच करणार ॲडव्हान्स Electric Car; मिळेल 400 KM रेंज

टाइम्स मराठी । Toyota कंपनी लवकरच मीड सेगमेंटमध्ये नवीन ऍडव्हान्स कार लॉन्च करणार आहे. सध्या या नवीन ऍडव्हान्स कारचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. टोयोटा कंपनीची ही ऍडव्हान्स कार मारुती EVX वर आधारित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि या ॲडव्हान्स कार चे नाव  TOYOTA URBAN असेल. ही टोयोटा अर्बन एक इलेक्ट्रिक कार असेल. यामध्ये बरेच वेगवेगळ्या फीचर्स देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. ही कार सर्वात आधी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. त्यानंतर 2024 मध्ये भारतामध्ये लॉन्च होईल. कंपनीने अजून या SUV च्या लॉन्चिंग आणि किमती बद्दल कोणतीच माहिती उपलब्ध केलेली नाही. जाणून घेऊया या कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

TOYOTA URBAN EV मध्ये दोन बॅटरी ऑप्शन मिळू शकतात. त्यानुसार कार मध्ये 60  KWH बॅटरी पॅक मिळू शकतो. यासोबतच  कार मध्ये फोर व्हील ड्राईव्ह आणि ऑल व्हील ड्राईव्ह हे ऑप्शन मिळतील. टोयोटाची ही इलेक्ट्रिक कार 27  PL स्ट्रॅकबोर्ड प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आली आहे. ज्यामुळे ही कार लॉंग रूटवर हाय परफॉर्मन्स देईल. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 400 km पर्यंत अंतर पार करेल.

TOYOTA URBAN EV  या कारची लांबी 4300 mm आणि 1820 mm रुंद असेल. या कारची उंची 1620 mm असेल. या कारमध्ये 2700 mm अप्रतिम व्हीलबेस देण्यात येईल. जेणेकरून कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना खराब रस्त्यामध्ये कमी धक्के लागतील. आणि आरामदायी प्रवास करता येईल. ही कार बॉक्सी फ्रंट लूक आणि मोठ्या टायर साईज मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.

फिचर्स

TOYOTA URBAN EV मध्ये C आकारात LED DRL देण्यात येतील. या कारचा फ्रंट लूक अत्यंत मस्कुलर डेव्हलप करण्यात आला आहे. यामध्ये LED लाईट सोबतच फ्रंट आणि रियर मध्ये लाईटची पूर्ण स्ट्रीप दिसेल. या टोयोटा अर्बन एसयूव्ही मध्ये टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ड्युअल स्क्रीन सेटअप सह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल डिस्प्ले, बॅक सीट वर चाईल्ड अँकर आणि रियर पार्किंग सेन्सर देण्यात येईल. यासोबतच सेफ्टी साठी एअरबॅग ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम हे सेफ्टी फीचर्स देखील यामध्ये मिळतील.