Force Motors ने लाँच केली Trax Cruiser जंगल सफारी; मिळतात हे खास फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बहुराष्ट्रीय वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणारी फोर्स मोटर्स ने मार्केटमध्ये Trax Cruiser Jungle Safari लॉन्च केली आहे. ही जंगल सफारी पूर्णपणे जीप आणि थार प्रमाणे रफ अँड टफ एडवेंचर SUV आहे. ही जंगल सफारी SUV खडबडीत रस्त्यावर लांबचा प्रवास करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. कंपनीने ही SUV भारतीय मार्केटमध्ये 20 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध केली आहे.   या SUV मध्ये कंपनीने ड्युअल सनरूफ, ५ डोअर्स बॅक सीट्स एसी वेन्ट उपलब्ध केले आहे. जेणेकरून  प्रवास करताना अप्रतिम अनुभव मिळेल.

   

चार्जिंग पॉइंट देखील उपलब्ध

मिळालेल्या माहितीनुसार, फोर्स मोटर्स ने लॉन्च केलेली टॅक्स क्रुझर जंगल सफारी ही ऑफ रोड साठी डिझाईन करण्यात आली आहे. यामध्ये सहा सीट आणि मोठ्या खिडक्या देण्यात आल्या आहे. या SUV मध्ये आरामदायी प्रवासासाठी बकेट सिट उपलब्ध करण्यात आले आहे. या SUV कार मध्ये कंपनीने चार्जिंग पॉइंट दिले आहे. जेणेकरून प्रवास करताना मोबाईल चार्ज करण्यास मदत होईल.

स्पेसिफिकेशन

Trax Cruiser Jungle Safari या SUV मध्ये  2.6 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 91 HP पावर आणि 250  NM पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिन सोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सुसज्ज करण्यात आले आहे. ही रफ अँड टफ SUV  5.1 मीटर लांब  आहे. यामध्ये सामान ठेवण्यासाठी मोठा बूट स्पेस मिळतो.

सस्पेन्शन आणि ब्रेकिंग

Trax Cruiser Jungle Safari मध्ये  साईड गार्ड, मोठे रुफ रँक , फ्रंट बुल बार सोबतच एक अग्रेसिव्ह अपील मिळते. फोर्स मोटर्स कंपनीने यामध्ये 3 मीटर या साईज मध्ये  व्हीलबेस दिले आहे. जेणेकरून खडबडीत आणि डोंगराळ रस्त्यावरून प्रवास करताना अडचण येणार नाही. यासोबतच भारी सस्पेन्शन सिस्टीम देखील यासोबत देण्यात आली आहे. जेणेकरून आरामदायक प्रवास करता येईल.

सेफ्टी फीचर्स

या SUV मध्ये  सुरक्षेसाठी ABS आणि EBD सिस्टीम देण्यात आली आहे. जेणेकरून SUV च्या चारही टायर्स साठी सेन्सर पॉवर्ड कंट्रोल मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार ही SUV महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र राखीव वन्यजीव अभयारण्यात अनोखा प्रवास करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. जेणेकरून जंगलामध्ये रोमांचक अनुभव मिळेल.