Triumph Scrambler 1200X : Triumph ने भारतात लाँच केली नवी बाईक; लूक पाहूनच मनात भरेल

Triumph Scrambler 1200X : रेट्रो बाईकसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी Triumph ने भारतीय बाजारपेठेत आपली आणखी एक नवी बाईक लाँच केली आहे. Triumph Scrambler 1200X असे या नव्या बाईकचे नाव असून कंपनीने यामध्ये अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. आकर्षक लूक आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असलेल्या या बाईकची किंमत 11.83 लाख रुपये आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर या बाईकचे लिस्टिंग करण्यात आलं आहे. आज आपण या बाईकचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात …..

   

बाईकचा लूक अतिशय आकर्षक असा असून खास करून तरुणाईच्या मनात बघताक्षणीत ही बाईक भरेल. गाडीला समोरील बाजूला गोल हेडलॅम्प बसवण्यात आलाय. Triumph Scrambler 1200X च्या सीटची उंची 820mm आहे. यात नॉन-ॲडजस्ट फ्रंट फोर्क्स आणि ॲडजस्टेबल प्रीलोडसह मागील मारझोची मोनोशॉकचे फीचर्स देण्यात आले आहेत. या बाईकचे वजन 228 किलो असून यामध्ये 15 लिटर इंधन टाकीची क्षमता आहे. Scrambler 1200X चा हँडलबार XE ट्रिमपेक्षा 65mm लहान आहे. या बाइकला 21-इंच फ्रंट आणि 17-इंच मागील वायर-स्पोक ॲल्युमिनियम व्हील आहेत, जे 90/90 फ्रंट आणि 150/70 रियर ट्यूबलेस टायर सह येतात.

इंजिन – Triumph Scrambler 1200X

गाडीच्या इंजिनबाबत सांगायचं झाल्यास, Triumph Scrambler 1200X मध्ये 270-डिग्री क्रँकसह 1,200cc, समांतर-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले असून 89 bhp पॉवर आणि 110 Nm पीक टॉर्क जनरेट करते. बाइकमध्ये रेन, रोड, स्पोर्ट, ऑफ-रोड आणि रायडर असे ५ रायडींग मोड असून परिस्तिथिनुसार तुम्ही ती चालवू शकता.

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या बाइकमध्ये पार्ट-टीएफटी आणि पार्ट-एलसीडी डिस्प्लेसह फुल्ल -डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि नोटिफिकेशन यांसारखे फीचर्स मिळतात.