KTM 390 Adventure ला टक्कर देणार Triumph Scrambler 400X; पहा काय आहेत फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Triumph Scrambler 400X ही रेट्रो लूक प्रदान करणारी बाईक काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आली आहे. TRIUMPH SCRAMBLER ही ब्रिटिश कंपनीने डेव्हलप केलेली बाईक असून सध्या या बाईकचे मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. कंपनीने ही बाईक 2.62 लाख रुपयांच्या किमतीमध्ये लॉन्च केली आहे. ही नवीन बाईक KTM 390 ॲडव्हेंचर एक्स या बाईकला बाजारात जोरदार टक्कर देईल. आज आपण या गाडीचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

डिझाईन आणि फीचर

Triumph Scrambler 400X ही रेट्रो मोडेल मध्ये उपलब्ध असलेल्या बाईकमध्ये 19 इंच चे मोठे फ्रंट व्हील देण्यात आले आहे. त्याचबरोबर या नवीन बाईक मध्ये लांब सस्पेन्शन, ऑफ रोड फूटपेग, संप गार्ड आणि हेडलाईट ग्रील देण्यात आले आहे. या बाईकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लच देण्यात आला आहे. या बाईक मध्ये देण्यात आलेल्या सीड ची उंची 835 mm एवढी आहे.  म्हणजेच कमी हाईट असलेले ग्राहक देखील अगदी आरामात ही बाईक चालवू शकतात.

स्पेसिफिकेशन

Triumph Scrambler 400X या बाईक मध्ये  लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन लॉंग रूट वर जास्त गरम होत नाही. ही या बाईकची खास गोष्ट आहे. या नवीन बाईक मध्ये कंपनीने 398 Cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 8000 RPM वर 40 HP पावर आणि 6500 RPM वर 37.5 NM पीक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर या इंजिन सोबत सहा स्पीड गिअर बॉक्स उपलब्ध करण्यात आले आहे. ही रेट्रो लूकवाली बाईक 150 किलोमीटर प्रति तास इतकं टॉप स्पीड देते आणि 6.71 सेकंदामध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तास स्पीड वाढवण्यास सक्षम आहे.

ब्रेकिंग सिस्टीम

Triumph Scrambler 400X या नवीन बाईकचा ग्राउंड क्लिअरन्स 195 MM इतका आहे. यामध्ये डिस्क ब्रेक सह अँटीबेकिंग सिस्टीम देखील उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे  बाईक कंट्रोल करण्यासाठी मदत मिळते. TRIUMPH SCRAMBLER 400X या बाईकचे वजन 177 किलोग्रॅम एवढे आहे.