Triumph ने लाँच केल्या 2 Retro Bikes; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । बाईक निर्माता कंपनी Triumph Motorcycles ने Triumph Speed 400 आणि Triumph Scrambler 400X या २ आकर्षक बाईक लाँच केल्या आहेत. रेट्रो लोक देणाऱ्या या दोन्ही बाईकचे लौंचिंग ग्लोबल मार्केट मध्ये म्हणजे जपान मध्ये करण्यात आलं आहे. या दोन्ही बाईकची डिलिव्हरी जानेवारी 2024 मध्ये सुरू करण्यात येणार आहे. यातील Triumph Speed 400 या बाईकची किंमत 699,999 जापानी येन म्हणजेच भारतीय चलनानुसार, 3.87 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर Triumph Scrambler 400X ची किंमत 789,000 जापानी येन म्हणजेच भारतीय चलनानुसार 4.37 लाख रुपये एवढी आहे. आज आपण जाणून घेऊया या बाईकचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

   

फीचर

Triumph Speed 400 ही बाईक स्टायलिश डिझाईन करण्यात आली आहे. यामध्ये DRL सह गोलाकार LED हेडलॅम्प उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबतच  या बाईकमध्ये गोल्डन अपसाईड डाऊन फोर्क देखील उपलब्ध आहे. आणि 13 लिटर फुल टॅंक देण्यात आला आहे. या फ्युएल टॅंक वर मोठा ट्रायम्प लोगो देखील बसवण्यात आलाय. यासोबतच बाईक मध्ये LED टेल लॅम्प, LED इंडिकेटर देण्यात आले आहे. तर दुसरीकडे Triumph Scrambler 400X मध्ये 19 इंच चे मोठे फ्रंट व्हील देण्यात आले आहे. नवीन बाईक मध्ये लांब सस्पेन्शन, ऑफ रोड फूटपेग, संप गार्ड आणि हेडलाईट ग्रील, स्लिप आणि असिस्ट क्लच देण्यात आले आहे. ही बाई एकाच फ्रेम वर डेव्हलप करण्यात आली असून या बाईकच्या फ्रंट मध्ये  43 mm अपसाईड डाऊन बिग पिस्टन फोर्क्स आणि प्री लोड अड्जस्टमेंट देण्यात आले आहे. यासोबतच पाठीमागील बाजूस गॅस चार्ज्ड मोनोशॉक युनिट उपलब्ध करण्यात आले आहे.

इंजिन-

Triumph Speed 400 आणि Triumph Scrambler 400X या दोन्ही बाईकमध्ये एक लिक्विड कुल्ड, 398 cc सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 18000 RPM वर 40 hp पावर आणि 65000 RPM वर 37.5 nm पिक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये देण्यात आलेले इंजिन पूर्णपणे नवीन डेव्हलप करण्यात आले आहे. या इंजिन ला TR सिरीज नाव देण्यात आले आहे. या इंजिन सोबत सहा स्पीड गिअर बॉक्स देण्यात आले आहे. ही बाईक 2.8 सेकंदामध्ये 0 ते 60 किलोमीटर प्रति तास एवढी स्पीड पकडते.