Triumph लवकरच लाँच करणार Speedmaster 400 Cruiser Bike; Royal Enfield ला देणार टक्कर

टाइम्स मराठी । सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या Royal Enfield Meteor 350 या बाईकला टक्कर देणारी कोणतीच बाईक मार्केट मध्ये अजून तरी उपलब्ध नाही. परंतु आता लवकरच Triumph कंपनीची क्रूजर बाईक लॉन्च होणार आहे. Triumph Speedmaster 400 Cruiser Bike असे या बाईकचे नाव आहे. यापूर्वी Triumph ने बजाज सोबत पार्टनरशिप केल्यानंतर भारतात Speed 400, Scrambler 400 या बाईक्स लॉन्च केल्या होत्या. आता कंपनी Triumph Speedmaster 400 Cruiser ही बाईक  लॉन्च करणार आहे. नुकतेच या बाईक बद्दल अपडेट समोर आले असून या बाईक बद्दल ब्रॅण्ड ने अजून तरी अधिकृत घोषणा केलेली नाही.

   

फिचर्स

Triumph Speedmaster 400 Cruiser या बाईकमध्ये बरेच ऍडव्हान्स फीचर्स आणि अपडेट्स बघायला मिळू शकतात. या अपकमिंग बाईकची डिझाईन बऱ्यापैकी बजाज ट्रायम्फच्या 400 cc बाईक पासून प्रेरित असेल. या बाईकमध्ये लॉन्ग व्हीलबेस, लांब सीट, नवीन रियर सबफ्रेम, लार्ज टियरड्रॉप फ्युएल टॅंक, USD फ्रंट फोर्क्स, क्रोम फिनिश एक्झॉस्ट, दोन्ही साईडने रेट्रो आणि क्लासिक मडगार्ड, बाईकच्या रियर मध्ये twin shock absorber सस्पेन्शन मिळण्याची शक्यता आहे.

स्पेसिफिकेशन

Triumph Speedmaster 400 Cruiser या बाईकमध्ये  398.15 सीसी सिंगल सिलेंडर 4V DOHC लिक्विड कुल्ड इंजिन मिळेल. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्स ला जोडलेलं असून 39.6 bhp पावर आणि 37.5 nm पीक टॉर्क जनरेट करेल. या अपकमिंग बाईक मध्ये फ्रंट साईडने 5 स्पोक स्टार शेप 18 इंच अलॉय व्हील आणि रियर मध्ये 16 इंच अलॉय व्हील्स मिळतील.

प्रतिस्पर्धा

Triumph Speedmaster 400 Cruiser या अपकमिंग बाईक मध्ये चार कलर ऑप्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. ही बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर रॉयल एनफिल्ड मेटियॉर 350 ला जोरदार टक्कर देईल. या अपकमिंग बाईकच्या लॉन्चिंग बद्दल अजून कोणतेच अपडेट मिळालेले नाही.