India Bike Week 2023 मध्ये Triumph Stealth Edition लॉन्च  

टाइम्स मराठी । गोवा मध्ये सुरु असलेल्या India Bike Week 2023 या इव्हेंट मध्ये Triumph ने आपली Triumph Stealth Edition बाईक लाँच केली आहे. यापूर्वी ही बाईक UK मध्ये लाँच कऱण्यात आली होती, मात्र आता प्रथमच भारतीय बाजारात ही बाईक लाँच करण्यात आली आहे. कंपनीने ही बाईक 9.09 ते 12.85 लाख रुपये एक्स शोरूम किमतीत उपलब्ध आहे. या बाईकचे बुकिंग सध्या सुरू करण्यात आले असून मार्च 2024 मध्ये डिलिव्हरी करण्यात येईल. आज आपण जाणून घेऊया Triumph Stealth Edition चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

Triumph Stealth Edition बाईक अप्रतिम डिझाईन आणि हॅन्ड पेंटेड कलर्स सह उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या लाइटिंग सिच्युएशन मध्ये ही बाईक वेगवेगळा लूक प्रदान करते. या नवीन ट्रायम्प स्टील्थ एडिशन रेंजमध्ये स्पीडमीटर रेड स्टील्थ एडिशन, बॉबर पर्पल स्टील्थ एडिशन, बोनविले T100 ब्ल्यू स्टील्थ एडिशन आणि  बोनविले T120 ब्ल्यू स्टील्थ एडिशन यांचा समावेश आहे. यासोबतच स्पीड ट्विन 900 ग्रीन स्टील्थ एडिशन, स्पीड ट्विन 1200 रेड स्टील्थ एडिशन, स्क्रैम्बलर 900 ऑरेंज स्टील्थ एडिशन, मैट सिल्वर फिनिश सह T120 ब्लैक स्टेल्थ एडिशन देखील मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

पावरट्रेन

Triumph Stealth Edition मध्ये देण्यात आलेलं डिझाईन फीचर्स आणि पावरट्रेन पूर्वीप्रमाणेच आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या बाईक मध्ये 888cc इन लाईन थ्री सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन 9500 RPM वर 107 BHP मॅक्झिमम पावर  आणि  6850  RPM वर 90 nm पिक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 6 स्पीड गिअरबॉक्स बसवण्यात आले आहे.

Triumph Stealth Edition ही स्पेशल एडिशन बाईक भारतात 2024 मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यासोबतच  Triumph Stealth Edition चे सर्व मॉडेल्स  ROLLS ROYCE प्रमाणे हाताने पेंट करण्यात आले आहे.  ही बाईक उजेडात आल्यानंतर  ग्रेफाईड शेड मुळे रंगसंगती बदलण्याची क्षमता ठेवते. ज्यामुळे प्रत्येक बाईकला डायनॅमिक लुक मिळतो. ही नवीन बाईक  बाकीच्या मॉडेलच्या तुलनेत थोड्या जास्त किमतीत उपलब्ध आहे. या बाईक्समध्ये स्पेशल इफेक्ट देण्यासाठी फ्युएल टॅंकला देखील वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करण्यात आले आहे. याशिवाय मिरर फिनिशिंग सिल्वर बेसकोट सह बेस मेटॉलिक  सिल्वर आईस कलर हाताने पेंट करण्यात आले आहे. या बाईकच्या बॉडीवर्क ला स्पेशल नीलमनी ब्लॅक ग्रिफाईड विग्नेट लावण्यात आले आहे. यामुळे ही बाईक अतिशय  आकर्षक दिसते.