भारतीय मार्केटमध्ये Triumph Tiger 900 चे 2 व्हेरिएंट लॉन्च; एवढ्या किमतीत उपलब्ध 

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाणारी Triumph ने टायगर 900 ही नवीन बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली असून सध्या उपलब्ध असलेली Triumph Tiger 900 रॅली ही बाईक बंद करण्यात आली आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या दोन्ही व्हेरिएंट चे नावे Triumph GT आणि Triumph Rally Pro ही आहे. यंदा दिवाळीसाठी तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही आज लॉन्च करण्यात आलेली बाईक तुम्ही घेऊ शकता.

   

स्पेसिफिकेशन

Triumph Tiger 900 या बाईकच्या GT आणि RELLY PRO या दोन्ही व्हेरिएंटमध्ये 888 cc लिक्विड कुल्ड DOHC ईन लाईन 3 सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8750 RPM वर 95 PS पावर आणि 7250 RPM वर 87 NM पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 6 स्पीड गिअर बॉक्स सुसज्ज करण्यात आले आहे. या दोन्ही बाईकच्या  मायलेज बद्दल बोलायचं झालं तर, ही बाईक प्रति लिटर  24.4 km एवढे मायलेज देते. तसेच या बाईकचे टॉप स्पीड 180 किलोमीटर प्रति तास इतकं आहे.

फिचर्स

Triumph Tiger 900 या बाईकच्या GT आणि RELLY PRO या दोन्ही व्हेरिएंटमध्ये फुल LED सेटअप आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी साठी 7 इंचाचा TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जोडण्यात आले आहे. या दोन्हींमध्ये स्लोपिंग स्टाईल फ्युएल टॅंक, सिंगल पीस सीट, एक्झॉस्ट, ट्रान्सपरंट  विंडस्क्रीन लावण्यात आली आहे. या बाईक्स मध्ये 6 वेगवेगळे रायडिंग मोड उपलब्ध आहेत. त्यानुसार रेन, रोड, स्पोर्ट, ऑफ रोड, रायडर कॉन्फिगरेबल, ऑफ रोड  प्रो या मोडचा समावेश होतो.

ब्रेकिंग सिस्टीम

या दोन्ही बाईक मध्ये कॉर्नरिंग अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम ABS वापरण्यात आली आहे. बाईकच्या फ्रंट आणि रियर मध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. त्याचबरोबर सस्पेन्शन साठी  फ्रंटला 45 NM इन्वर्टेड फॉर्क्स, रियर मध्ये मॅन्युअल प्रीलोड सह शॉक एक्झॉर्बर  देण्यात आले आहे.

किंमत किती

Triumph Tiger 900 या बाईकच्या GT आणि RELLY PRO या दोन्ही व्हेरिएंट च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, Triumph Taiger 900 GT या व्हेरिएंटची किंमत 13.95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आणि  Triumph Taiger 900 Rally pro या बाईकची किंमत 15.95 लाख रुपये आहे.