TVS iQube ST Vs Ather Rizta Z : कोणती स्कुटर बेस्ट? पहा मायलेजसह संपूर्ण तुलना?

TVS iQube ST Vs Ather Rizta Z । मागील काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढलेली आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कुटर खरेदीला ग्राहक आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अनेक नवनवीन इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात लाँच होत आहेत. मागील आठवड्यात TVS iQube ST हि इलेक्ट्रिक स्कुटर मार्केट यामध्ये दाखल झाली आहे. हि स्कुटर Ather Rizta Z ला तगडी फाईट देईल असं बोललं जातंय. तुम्ही सुद्धा नवीन इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याच्या विचारात असाल आणि TVS iQube ST घेऊ कि Ather Rizta Z घेऊ यात तुमचाही गोंधळ उडाला असेल तर चिंता करू नका .. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही इलेक्ट्रिक स्कुटरची बॅटरी, रेंज, फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तर तुलना करत सांगणार आहोत. त्यानंतर तुम्हीच ठरवा कोणती स्कुटर तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.

   

लांबी- रुंदी

TVS iQube ST ची लांबी 1085 मिमी, रुंदी 645 मिमी आणि उंची 1140 मिमी आहे. तर गाडीचा ग्राउंड क्लीयरन्स 157 मिमी आहे. टीव्हीएसच्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या सीटची उंची 770 मिमी आणि व्हीलबेस 1301 मिमी आहे. तर दुसरीकडे Ather Rizta Z ची लांबी 1850 mm, रुंदी 750 mm आणि उंची 1140 mm आहे. स्कुटरचा ग्राउंड क्लीयरन्स 165 मिमी आणि व्हीलबेस 1285 मिमी आहे. TVS iQube ST ला समोर 220 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 130 mm ड्रम ब्रेक मिळतो. तर Ather Rizta Z ला CBS समोर डिस्कसह आणि मागील बाजूस ड्रम देण्यात आला आहे.

बॅटरी आणि रेंज – TVS iQube ST Vs Ather Rizta Z

TVS iQube ST या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये कंपनीने 3.4 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच हि इलेक्ट्रिक स्कुटर BLDC हब माउंट मोटरसह येत असून 4.4 kW चा पीक पॉवर आणि 140 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. या स्कुटरची बॅटरी फुल्ल चार्ज होण्यासाठी ४ तासांचा वेळ लागतो मात्र एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर टीव्हीएसची हि इलेक्ट्रिक स्कुटर 100 किलोमीटर अंतर आरामात पार करते. तर दुसरीकडे Ather Rizta Z मध्ये 3.7 kWh ची बॅटरी बसवण्यात अली असून हि बॅटरी फुल्ल चार्ज होण्यासाठी ४ तासांतून जास्त वेळ लागतो. मात्र एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल १५९ किलोमीटरची रेंज देते. (TVS iQube ST Vs Ather Rizta Z)

किंमत किती?

दोन्ही इलेक्ट्रिक स्कुटरच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, TVS iQube ST च्या 3.4 kWh बॅटरी असल्लेया स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.55 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर Ather Rizta Z ची एक्स शोरूम किंमत 1.45 लाख रूपये आहे.