टाइम्स मराठी । (TVS Jupiter 110 ZX) प्रसिद्ध स्कुटर निर्माता Jupiter ने बाजारात आपली नवी अत्याधुनिक आणि अनेक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी स्कुटर बाजारात आणली आहे. या गाडीचे नाव TVS Jupiter 110 ZX असं असून ती SmartXonnect या टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे. Tvs ने या स्कूटरची किंमत 84,468 एवढी ठेवली आहे . आज आपण या स्कुटरचे इंजिन, फीचर्स आणि यामध्ये देण्यात आलेल्या अन्य टेक्नॉलॉजी बद्दल जाणून घेऊयात.
काय आहेत फीचर्स –
TVS Jupiter 110 ZX या स्कूटरमध्ये SmartXonnect या टेक्नॉलॉजी सह ब्लूटूथ इनेबल डिजिटल कन्सोल देण्यात आला आहे. त्याचबरोबर ही टेक्नॉलॉजी टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, वोयस असिस्ट, कॉल आणि एसएमएस अलर्ट यासारखे फीचर्स देते. याशिवाय या स्कूटर वरिअंट मध्ये स्मार्टफोन साठी बिल्ड इन यूएसबी चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे. TVS Jupiter 110 ZX या स्कूटरच्या ड्रम ब्रेक मध्ये कम्बाईन ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली असून दोन्हीकडून 130 mm ड्रोन ब्रेक देण्यात आलेला आहे. स्कूटरच्या दोन्ही साईडने 12 इंच ट्यूबलेस टायर देखील उपलब्ध आहे.

109.7 cc इंजीन –
SmartXonnect या टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असलेली TVS Jupiter 110 ZX या स्कूटरमध्ये 109.7 cc सिंगल सिलेंडर, फ्युल इंजेक्शन सह एयर कुल्ड इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन ऑटोमॅटिक सीवीटी गियरबॉक्सला जोडलेलं असून 7,500 rpm वर 7.7 bhp पॉवर आणि 5,500 rpm वर 8.8 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

किंमत किती ?
गाडीच्या किमतीबद्दल सांगायचं झाल्यास, TVS ज्युपिटर रेंज बेस ट्रिमची किंमत 73,240 रुपयांपासून सुरू होते, तर ज्युपिटर क्लासिक व्हेरियंटसाठी 89,648 तुम्हाला मोजावे लागतील. तुम्ही ही स्कूटर लाईट ब्ल्यू आणि ओली गोल्ड कलर मध्ये खरेदी करू शकता. भारतीय बाजारात TVS Jupiter 110 ZX होंडा ऍक्टिव्हाला टक्कर देईल.