TVS Ronin Special Edition : दिवाळीनिमित्त TVS ने लाँच केलं Ronin चे स्पेशल एडिशन

टाइम्स मराठी । भारतीय टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळख असलेल्या TVS मोटर्सने दिवाळीच्या निमित्ताने Ronin चे स्पेशल एडिशन लाँच (TVS Ronin Special Edition) केलं आहे. कंपनीने मार्केटमध्ये ही बाईक ३ व्हेरियंट आणि ६ सहा कलर ऑप्शनसह उपलब्ध केली आहे. या स्पेशल एडिशन बाईक मध्ये कंपनीने बरेच फीचर्स ऍड केले असून अप्रतिम डिझाईन मध्ये ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे. आपण आपण या बाईकचे फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

TVS Ronin Special Edition मध्ये 225.9cc सिंगल सिलेंडर 4 स्टोक ऑइल कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 20.4 ps पावर आणि 19.93  nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 5 स्पीड गिअर बॉक्स देण्यात आले आहे. या बाइकमध्ये असलेल्या फ्युएल टॅंकची कॅपॅसिटी 14 लिटर एवढी आहे. ही बाईक मार्केट मध्ये रॉयल एनफिल्ड हंटर 350 आणि होंडा CB350RS या गाडयांना टक्कर देईल.
सस्पेन्शन आणि ब्रेकिंग सिस्टीम

ही बाईक डबल क्रेडल स्प्लिट सिंको स्तिफ फ्रेम वर डेव्हलप करण्यात आली आहे. या बाईकमध्ये रायडिंग साठी 9 स्पोक अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. बाईकच्या फ्रंट मध्ये 41 किलोमीटर अपसाईड डाऊन USD फोर्क सस्पेन्शन लावण्यात आले आहे. आणि पाठीमागील बाजूला 7 स्टेप ऍडजेस्टेबल प्रीलोड मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. TVS Ronin Special Edition या बाईकमध्ये ब्रेकिंग ड्युटी साठी फ्रंटला 300 mm डिस्क ब्रेक आणि रियरला 240 mm डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहे. ही बाईक ड्युअल चॅनेल ABS सह उपलब्ध आहे.  या बाईकमध्ये रेन आणि अर्बन हे दोन  ABS मोड मिळतात.

फिचर्स– TVS Ronin Special Edition

या बाईकमध्ये स्मार्ट एक्स कनेक्ट सह  डिजिटल क्लस्टर, साईड स्टॅन्ड इंडिकेटर, गियर शिफ्ट इंडिकेटर, ग्लाईड थ्रू टेक्नॉलॉजी, सर्विस ड्यू इंडिकेटर, टी फेस पायलट लॅम्प, ऑल LED टेललॅम्प, कस्टम एक्झॉस्ट, 9 स्पोक अलॉय व्हील, रेन अँड अर्बन एबीएस मोड, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी,  व्हॉइस असिस्टंट,  डिस्टन्स टू एम्प्टी यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत किती?

TVS Ronin Special Edition या बाईक मध्ये ३ व्हेरिएंट आणि ६ कलर ऑप्शन उपलब्ध आहे. कंपनीने ही बाईक 1.49 लाख रुपयांपासून 1.69 लाख रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. या बाईकच्या ३ व्हेरियंटमध्ये सिंगल टोन-सिंगल चैनल, ड्युअल टोन-सिंगल चॅनेल, ट्रिपल टोन – ड्युअल चॅनेल हे व्हेरियंट उपलब्ध आहे.