TVS Ronin Special Edition : TVS ने लाँच केलं Ronin चे Special Edition; एवढी आहे किंमत 

TVS Ronin Special Edition । सर्वत्र दिवाळी खरेदीची तयारी सुरू आहे. दिवाळी फेस्टिवल निमित्त भारतात वाहन खरेदी करणे आणि सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यानुसार दिवाळीच्या निमित्ताने बरेच जण नवीन गाड्या खरेदी करत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही देखील यंदा दिवाळीला नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रसिद्ध कंपनी TVS ने आपल्या आकर्षक स्पोर्ट बाईक Ronin चे Special Edition लाँच केलं आहे. TVS Ronin च्या Special Edition बाईक मध्ये बरेच बदल करण्यात आले असून यामध्ये ३ कलर ऑप्शन कंपनीने दिले आहेत. या बाईकची किंमत 1.73 लाख रुपये आहे. आज आपण जाणून घेऊया या बाईकचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

डिझाईन

TVS Ronin Special Edition मध्ये स्टॅंडर्ड व्हर्जन पेक्षा वेगळे बॉडी ग्राफिक्स देण्यात आले आहे. या स्पेशल एडिशन बाईक मध्ये निंबस ग्रे शेड देण्यात आला आहे. यासोबतच  कंपनीने या बाईक मध्ये तीन कलरचा वापर केला आहे. त्यानुसार या बाईकच्या फ्युल टॅंकला आणि साईड पॅनलला लाल रंग आणि पांढरी स्ट्रीप देण्यात आली आहे. यामुळे स्पेशल एडिशन बाईकला वेगळाच लूक मिळतो. कंपनीने या बाईकच्या डिझाईन आणि फीचर्स मध्ये कोणतेच बदल केलेले नाही.

स्पेसिफिकेशन– TVS Ronin Special Edition

TVS Ronin Special Edition या बाईकमध्ये 225.9 cc सिंगल सिलेंडर ऑइल कोल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7750  RPM वर 20.1 BHP पावर आणि 3750 RPM वर 19.93 NM पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत बाईक मध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. या बाईकमध्ये अर्बन आणि रेन हे दोन राइडिंग मोड दिले आहे.

ॲक्सेसरीज

TVS Ronin Special Edition या बाईक मध्ये कंपनीने काही प्री इन्स्टॉल ॲक्सेसरीज देखील दिली आहे. यामध्ये USB फोन चार्जर वायझर इंजिन कव्हर यांचा समावेश होतो. TVS Ronin या स्टॅंडर्ड वर्जन मध्ये देण्यात आलेले गोल्डन अपसाईड डाऊन टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन हे स्पेशल एडिशन मध्ये सुद्धा देण्यात आले आहे. या बाईकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल ABS देण्यात आले आहेत .

फिचर्स

TVS Ronin Special Edition मध्ये देण्यात आलेल्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, फुल LED राऊंड हेडलॅम्प, LED टर्न इंडिकेटर, LED टेललाईट  देण्यात आले आहे. यासोबतच 17 इंच अलोय व्हील यासह ट्यूबलेस टायर देखील यामध्ये मिळतात. TVS कंपनीने या मॉडेलमध्ये रेट्रो लूक प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे.