Splendor, Platina ला टक्कर देतेय TVS ची ‘ही’ बाईक; मायलेज सुद्धा मिळतंय जास्त

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या बऱ्याच बाईक उपलब्ध आहेत.  त्याचबरोबर बाईक खरेदी करत असताना  ग्राहक देखील मायलेज, इंजन, फीचर्स, रेंज, या सर्व गोष्टींची शहानिशा करून बाईक खरेदी करत असतात. ग्राहक खास करून जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या खरेदी करत असतात. तुम्ही देखील अप्रतिम मायलेज देणारी बाईक खरेदी करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका गाडी बद्दल सांगणार आहोत. TVS Sport असे या बाईकचे नाव असून भारतीय बाजारात ही गाडी Splendor, Platina, CT 100 या गाडयांना टक्कर देते.

   

TVS Sport ही बाईक अप्रतिम मायलेजसह नवीन टेक्नॉलॉजी आणि फीचर्सने परिपूर्ण आहे. त्याचबरोबर एकेकाळी प्रचंड पॉप्युलर असलेल्या स्प्लेंडर प्लेटिना यासारख्या बाईक्सला देखील TVS Sport बाईक टक्कर देते. या बाईकचे मायलेज आणि किंमत दोन्हीही अप्रतिम आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून TVS कंपनीच्या स्टार स्पोर्ट बाईकला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. आज आपण जाणून घेऊया या स्पोर्ट बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

स्पेसिफिकेशन

TVS Sport या बाईकमध्ये 110cc  एयर कूल्ड, सिंगल सिलेंडर FI  इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन  7350 RPM वर  6.03  BHP पावर आणि 4500 RPM वर  8.7 NM पिक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये देण्यात आलेल्या इंजन सोबत चार स्पीड गिअर बॉक्स देण्यात आले आहे. ही बाईक अपडेटेड BS6 फेज 2 नॉर्म्स चे पालन करते. आणि  E20 इंधन वर चालण्यास ही बाईक सक्षम आहे. TVS Sport एक लिटर पेट्रोलमध्ये 76 किलोमीटर एवढे शानदार मायलेज देते. कंपनीने या बाईकमध्ये इकोथ्रस्ट फ्यूल इंजेक्शन टेक्नॉलॉजी वापरली आहे.

फीचर

TVS Sport मध्ये समोरच्या साईडने टेलिस्कोपिक फोर्क, मागच्या साईडने मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. एवढेच नाही तर ब्रेकिंग साठी या बाईक मध्ये ड्रम ब्रेक उपलब्ध आहे. या बाईकमध्ये स्टॅंडर्ड अलॉय व्हील आणि कॉम्बि ब्रेक सिस्टीम देण्यात आली आहे. यामुळे ही बाईक स्पोर्टी लूक प्रदान करते.

किंमत किती?

TVS Sport ही बाईक दोन व्हेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आली होती. त्यानुसार या बाईकची किंमत देखील ठरवण्यात आली होती. या बाईकच्या ES व्हेरीएंटची एक शोरूम किंमत 59,431 रुपये एवढी आहे. आणि ELS व्हेरिएंटची किंमत 70,773 रुपये एवढी आहे.