TVS ने लाँच केली आकर्षक Electric Scooter, बघता क्षणीच पडेल भुरळ; काय आहेत फीचर्स?

टाइम्स मराठी । वाढत्या पेट्रोल डिझेलचे भाव पाहता सर्वसामान्य नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची जास्त चलती आहे. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती परवडणाऱ्या असून डिझाईन आणि रेंजमुळे तरुणांच्या पसंतीस या इलेक्ट्रिक स्कूटर उतरत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवण्यामध्ये लक आजमावत असून देशातील टू व्हीलर निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर चे नाव TVS X असून स्कूटरचा आकर्षक लूक आणि डिझाईन नक्कीच तुमच्या मनाला भावेल. आज आपण घेऊया TVS X या स्कूटरचे फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेऊयात.

   

TVS X डिझाईन आणि लुक

TVS X या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये हाय क्वालिटी ॲल्युमिनियम फ्रेम वापरण्यात आली असून त्याचं नाव कंपनीने TVS Xleton हे ठेवले आहे. या स्कूटर ला शार्प आणि स्पोर्टी लुक आणि डिझाईन देण्यात आले आहे. त्याचबरोबर कंपनीने या नवीन स्कूटरबाबत सांगितलं की, ही इलेक्ट्रिक स्कूटर टिकाऊ आणि कॉलिटी यामुळे इंडस्ट्रीमध्ये एक बेंच मार्क स्थापित करेल. या स्कूटरमध्ये रेगुलर स्कूटर प्रमाणे फ्लोर बोर्ड देण्यात आलेला नाही. फ्लोर बोर्ड ऐवजी यामध्ये फ्रेम देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सीटच्या खाली 19 लिटर अंडर सीट स्टोरेज स्पेस उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात सामान ठेवू शकता.

140 किलोमीटर रेंज –

TVS X या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये PMSMइलेक्ट्रिक मोटर देण्यात आलेली असून ही मोटर 11 kW पीक पावर आणि 40nm पिक टॉर्क जनरेट करते. या स्कूटर मध्ये 4.4kWh क्षमता असलेली बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. ही बॅटरी 3kw च्या फास्ट चार्जर ने चार्ज केल्यास 50 मिनिटांमध्ये 0-50 टक्के चार्ज होते. याशिवाय 950W चहा रॅपिड पोर्टेबल चार्जरने चार्ज केल्यास चार तासांमध्ये 80% चार्ज होते. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर TVS Xतब्बल १४० किलोमीटर पर्यंत अंतर पार करेल.

ब्रेकिंग सिस्टीम

TVS X या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंट मध्ये 220 mm डिस्क ब्रेक देण्यात आलेला असून मागच्या साईडला 195mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. यासोबतच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देखील यामध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर ही देशातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्यामध्ये एबीएस सिस्टीम वापरण्यात आली आहे. या स्कूटर च्या टायर बद्दल बोलायचं झालं तर यात 12 इंच व्हील देण्यात आले असून फ्रंटला 100 सेक्शन आणि मागच्या साईडने 110 सेक्शन टायर वापरले आहे.

फीचर्स

TVS X या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये कंपनीने 10.2 इंच टिल्टेबल TFT डिस्प्ले देण्यात आलेला असून या डिस्प्ले च्या माध्यमातून चालक सुविधेनुसार कोणत्याही अँगल मध्ये सेट करू शकतात. या डिस्प्ले मध्ये वेगवेगळे फंक्शन ऑपरेट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर च्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. यासोबतच तुम्ही स्कूटरमध्ये स्मार्टफोन कनेक्ट करू शकतात. आणि म्युझिक नेव्हिगेशनचा देखील वापर करू शकतात. त्याचबरोबर यात रिवर्स असिस्टंट क्रूज कंट्रोल, हिल होल्ड यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत

टीव्हीएस कंपनीने दुबई येथे झालेल्या ग्लोबल इव्हेंट मध्ये ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. या इलेक्ट्रिक स्कूटर ची सुरुवाती किंमत 2.5 लाख रुपये असून ही सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर असू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. सुरुवातीला या स्कूटरची डिलिव्हरी बेंगलोर मध्ये करण्यात येईल. त्यानंतर मार्च 2024 पर्यंत वेगवेगळ्या भागांमध्ये डिलिव्हरी केला जाईल. याशिवाय कंपनीकडून सुरुवातीला 2000 ग्राहकांना स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे. जर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छित असाल तर ऑनलाइन बुकिंग देखील सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन प्री बुकिंग साठी तुम्हाला पाच हजार रुपये भरावे लागतील.