स्टायलिश लूक अन दमदार मायलेज; TVS ची ‘ही’ Scooter तुमच्याही मनात भरेल

टाइम्स मराठी । आज-काल इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे ग्राहक मोठ्या संख्येने पसंती दर्शवतात. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहन  हा पर्याय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा स्टायलिश लुक, मायलेज यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वाहन निर्माण करत आहेत. त्यानुसार मार्केटमध्ये बऱ्याच इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत अप्रतिम मायलेज देणाऱ्या, 2.5 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध असलेल्या  टीव्हीएस कंपनीच्या TVS X या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल.

   

डिझाईन

TVS X या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये हाय क्वालिटी ॲल्युमिनियम फ्रेम वापरण्यात आली असून त्याचं नाव कंपनीने TVS Xleton हे ठेवले आहे. या स्कूटर ला शार्प आणि स्पोर्टी लुक आणि डिझाईन देण्यात आली आहे.  ही इलेक्ट्रिक स्कूटर टिकाऊ आणि कॉलिटी यामुळे इंडस्ट्रीमध्ये एक बेंचमार्क स्थापित करेल. या इलेक्ट्रिक स्कूटर च्या सीटच्या खाली 19 लिटर अंडर सीट स्टोरेज स्पेस उपलब्ध आहे.  त्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात सामान ठेवू शकतात.

परफॉर्मन्स

TVS X हे इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलेली असून ही मोटर 11 kW पीक पावर आणि 40nm पिक टॉर्क जनरेट करते. या स्कूटर मध्ये 4.4kWh क्षमता असलेली बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे.  ही बॅटरी 3kw च्या फास्ट चार्जर ने चार्ज केल्यास 50 मिनिटांमध्ये 0-50 टक्के चार्ज होते.  याशिवाय 950W चहा रॅपिड पोर्टेबल चार्जर ने चार्ज केल्यास चार तासांमध्ये 80% चार्ज होते. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल १४० किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करते.

ब्रेकिंग सिस्टीम

TVS X  या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंट मध्ये 220 mm डिस्क ब्रेक देण्यात आलेला असून मागच्या साईडने 195mm दिस ब्रेक देण्यात आला आहे. यासोबतच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देखील यामध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर ही देशातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्यामध्ये एबीएस सिस्टीम वापरण्यात आली आहे. या स्कूटर च्या टायर बद्दल बोलायचं झालं तर यात 12 इंच व्हील देण्यात आले असून फ्रंटला 100 सेक्शन आणि मागच्या साईडने 110 सेक्शन टायर वापरले आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

TVS X या इलेक्ट्रिक स्कूटर च्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. यासोबतच तुम्ही स्कूटरमध्ये स्मार्टफोन कनेक्ट करू शकतात. आणि म्युझिक नेव्हिगेशनचा देखील वापर करू शकतात. त्याचबरोबर यात रिवर्स असिस्टंट क्रूज कंट्रोल हिल होल्ड यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. TVS X  या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये कंपनीने 10.2 इंच टिल्टेबल TFT डिस्प्ले देण्यात आलेला असून या डिस्प्ले च्या माध्यमातून चालक सुविधेनुसार कोणत्याही अँगल मध्ये सेट करू शकतात. या डिस्प्ले मध्ये वेगवेगळे फंक्शन ऑपरेट करण्याची सुविधा देण्यात आली आहे.