आता Twitter वरून शोधता येणार जॉब; लाँच झालं नवं फीचर्स

टाइम्स मराठी | Twitter या मायक्रो ब्लॉगिंग साईट मध्ये Elon Musk मस्क वेगवेगळे बदल करत आहे. यासोबतच त्यांनी ट्विटर मध्ये बरेच फीचर्स उपलब्ध केले आहेत. जेणेकरून युजर्सला ट्विटर वापरताना अप्रतिम अनुभव मिळेल.  एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर चा लोगो, ट्विटरचे नाव बदलले होते. त्यानंतर ब्लू टिक पेड करण्यात आली होती. आता एलन मस्क  ट्विटर वर आणखीन काही फीचर्स उपलब्ध करणार आहे. जेणेकरून युजर्स ला  ट्विटर वापरताना मजेशीर अनुभव मिळेल. आता ट्विटरच्या माध्यमातून  लिंकडिंग प्रमाणे जॉब सर्च करणे देखील सोपे होईल. त्यासाठी ट्विटरने X JOB SEARCH TOOL हे फीचर लॉन्च केले आहे.

   

काय आहे हे फीचर

आतापर्यंत युजर्स LINKDIN या वेबसाईटच्या माध्यमातून जॉब सर्च करत होते. परंतु ट्विटर ने लॉन्च केलेल्या या नवीन फिचरच्या माध्यमातून युजर्स ला मायक्रो ब्लॉगिंग वापरत असतानाच जॉब सर्च करता येईल. म्हणजे आता युजर्स X प्लॅटफॉर्म वरून डायरेक्ट जॉब शोधू शकतील. आणि या सोबतच नवीन टॅलेंटेड युजर्स ला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून  कंपन्या हायरिंग करू शकतील. कंपनीने ऑगस्ट महिन्यात या फीचर चे बीटा व्हर्जन रोल आउट केले होते. आता हे फीचर्स सर्व युजरसाठी रोल आउट करण्यात आले आहे. परंतु सध्या तरी हे फीचर अँड्रॉइड युजर साठी उपलब्ध नसून वेब युजर साठी वापरण्यात येत आहे.  लवकरच iphone आणि Android साठी देखील हे फीचर लॉन्च करण्यात येईल.

अशा पद्धतीने सर्च करा जॉब

हे जॉब सर्च फिचर एलन मस्क यांनी व्हेरिफाइड अकाउंट रिस्ट्रीक्शन सह उपलब्ध केले आहे. युजर्सला हे फीचर वापरण्यासाठी फक्त  साइन इन करावे लागेल. त्यानंतर जॉब सर्च पेज येईल. तुम्ही जॉब सर्च टूल वर पोहोचल्या नंतर तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील. त्यापैकी पहिला प्रश्न जॉब टायटल कीवर्ड असेल आणि दुसरा म्हणजे लोकेशन. हे दोन्ही ऑप्शन भरल्यानंतर  तुम्हाला सर्च बटन या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वर्क रिलेटेड जॉब लिस्ट दिसेल.

अशा पद्धतीने करा अप्लाय

तुम्हाला जॉब साठी अप्लाय करायचं असेल तर ट्विटरच्या माध्यमातून थेट अप्लाय करता येणार नाही. त्यासाठी सर्वात आधी अप्लाय बटनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर कंपनीच्या हायरिंग पेजवर जावे लागेल. मग तुम्ही अप्लाय करू शकतात. ट्विटर ने लॉन्च केलेले जॉब सर्च हे एक बेसिक टूल आहे. त्यामुळे यामध्ये तुम्हाला फुल टाइम, फ्रीलान्स, पार्ट टाइम, हायब्रीड असे ऍडव्हान्स सर्च फिल्टर मिळणार नाही.