अखेर Twitter ने लाँच केलं Audio- Video कॉलिंग फीचर्स

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लोगिंग प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच Twitter वर एलन मस्क वेगवेगळे फीचर्स अपडेट करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून  ट्विटरवर  व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल फीचर येणार असल्याची चर्चा रंगली होती. आता हे व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल फीचर कंपनीने लाईव्ह करणे सुरू केले आहे. म्हणजेच आता हळूहळू यूजर्सला या फीचर चा लाभ घेता येईल. काही महिन्यांपूर्वी ट्विटर मध्ये  फेसबुक प्रमाणेच कम्युनिटी ग्रुप मेकिंग  फीचर उपलब्ध करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यामध्ये कंपनीचे CEO लिंडा याकरिनो यांनी ऑडिओ व्हिडिओ कॉलिंग या फीचर्स बद्दल माहिती दिली होती.

   

जाणून घ्या काय आहे फीचर

इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या रिपोर्टनुसार, Twitter मध्ये उपलब्ध होणारे नवीन फीचर DM म्हणजेच डायरेक्ट मेसेज ऑप्शनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर कंपनीकडून या फीचरसाठी काही डिस्ट्रिक्शन देखील लावू शकतात. जेणेकरून युजर्स ला सेक्युरली कॉलिंग आणि स्पॅम कॉल पासून लांब राहता येईल. या फीचर च्या माध्यमातून  युजर्सचा नंबर शेअर होणार नाही. म्हणजेच नंबर शेअर न करता ट्विटरच्या माध्यमातून व्हिडिओ ऑडिओ कॉलिंग च्या माध्यमातून संवाद साधता येईल.

कोणासाठी व्हेरिफाय असेल हे फीचर

ट्विटर वर उपलब्ध करण्यात येणारे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल फीचरचे नवं व्हर्जन एलन मस्क यांनी ट्विटरवर पोस्ट च्या माध्यमातून शेअर केले आहे. हे फीचर तुमच्या हि ट्विटर अकाउंट मध्ये दिसत असेल तर तुम्ही त्याचा या फीचर्स चा वापर करू शकतात. हे फीचर उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ ऑडिओ कॉलिंग साठी एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनला ऑन केल्यानंतर तुम्हाला कोण कॉल करू शकते हे तुम्ही ठरवू शकतात. परंतु अजूनही तुमच्या ट्विटर मध्ये व्हिडिओ कॉलिंग किंवा ऑडिओ कॉलिंग ऑप्शन उपलब्ध नसेल तर तुम्हाला काही वेळ वाट बघावी लागेल. त्याचबरोबर हे फीचर  फक्त कॉन्टॅक्ट किंवा तुम्ही ट्विटरवर ज्या व्यक्तींना फॉलो करतात त्यांच्यासाठीच व्हेरिफाइड आहे.

अशा पद्धतीने वापरा ऑडिओ व्हिडिओ कॉल फीचर

1) सर्वात आधी ट्विटरच्या सेटिंग मध्ये जा.
2) सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रायव्हसी अँड सेफ्टी ऑप्शन दिसेल.
3) त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मेसेज हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
4)  त्यानंतर तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग ऑप्शन दिसेल.
5) या ऑप्शनला ऑन केल्यानंतर तुम्ही या फीचर्स चा वापर करू शकतात.