Twitter New Log । नुकतीच ट्विटरसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर बर्ड लोगो बदलला असून आता इथून पुढे बर्डची जागा “X” घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटर वरील चिमणी गायब होणार अशा चर्चा सुरु होत्या, अखेर आज मस्क यांनी निर्णय घेतलाच. ट्विटरचा नवीन लोगो ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयात देखील दिसला आहे. याचा फोटो सीईओ लिंडा याकारिनो यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क ट्विटरचा लोगो बदलतील अशी चर्चा सुरू होती. यासाठी त्यांनी 149 दशलक्ष फॉलोअर्सना X लोगो सुचवण्यासाठी आमंत्रित केले होते. यानंतर फॉलोवर्सने देखील त्यांना अनेक X लोगोच्या डिझाइन्स दिल्या. आता त्यातलीच एक डिझाईन ट्विटरच्या लोगोसाठी निवडण्यात आली आहे.
मस्क “X” नावाचे सुपर ॲप तयार करण्याच्या मार्गावर- (Twitter New Log)
सीईओ लिंडा यांच्यासोबत इलॉन मस्कने देखील आपले प्रोफाइल बॅज बदलले आहे. इलॉन मस्कच्या बॅजवर निळ्या पक्ष्याच्या जागी X लिहिलेले (Twitter New Log) दिसत आहे. सध्या इलॉन मस्क “X” नावाचे “सुपर ॲप” तयार करण्याच्या मार्गावर आहेत. हे ॲप चीनच्या WeChat सारखे काम करणार आहे. ट्विटरमध्ये नुकतेच नवनवीन बदल पाहायला मिळत आहेत. त्यातलाच लोगो बदलणे हा एक प्रयोग आहे. मुख्य म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क यांचे एक ट्विट चर्चेत आले होते. यामध्ये त्यांनी, “आता ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. लवकरच आपण ट्विटर ब्रँडला अलविदा करू. ट्विटरसोबतच हळू हळू सर्वच पक्ष्यांना आपण उडवून लावू” असे म्हणले होते. या ट्विटमुळे ट्विटरमधील बदलांबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते.
दरम्यान इलॉन मस्कने आणलेला X लोगो हा ब्लॅक रंगाचा आहे. सध्या ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. आता ट्विटर इंस्टाग्राम सोबत स्पर्धा करणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण की, नवीन बदलांनुसार ट्विटर आता मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ऑडिओ, व्हिडिओ, मेसेजिंग व्यतिरिक्त बँकिंग असे फिचर्स देखील उपलब्ध करून देणार आहे.