Twitter लवकरच लॉंच करणार प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅन; एवढ्या किमतीत असेल उपलब्ध

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेल्या प्लॅटफॉर्म Twitter मध्ये एलन मस्क यांनी बरेच बदल केले होते. त्यानुसार याच वर्षी ट्विटरने पेड सबस्क्रिप्शन सर्विस देखील सुरू केली होती. ही सर्विस भारतासोबतच बाकी देशांसाठी देखील उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता ट्विटर नवीन प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

   

ट्विटरच्या या प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅनमध्ये वेगवेगळे फीचर्स आणि सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याबाबत ट्विटरचे सीईओ लिंडा याकारिनो (linda yaccarino) यांनी माहिती देत सांगितलं की, या सबस्क्रीप्शन प्लॅनच्या माध्यमातून कंपनी जास्त रेवेन्यू जनरेट करू शकेल. आणि यामध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात येतील. यापूर्वी देखील एलन मस्क यांनी इज्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत चर्चा करत असताना या नवीन प्लॅनच्या लॉन्चिंग बद्दल माहिती दिली होती.

भारतामध्ये ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन प्लानची किंमत अँड्रॉइड युजरसाठी आणि आयफोन युजरसाठी तसेच वेब यूजर साठी वेगवेगळी आहे. त्यानुसार अँड्रॉइड आणि आयफोन यूजर साठी 900 रुपये प्रति महिना एवढी किंमत ठेवण्यात आली आहे. आणि वेब यूजर साठी ही किंमत 650 प्रति महिना ठेवण्यात आली आहे. तर संपूर्ण वर्षभराच्या सबस्क्रिप्शनसाठी ग्राहकांना 9,400 रुपये मोजावे लागणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, नुकताच ट्विटरच्या लेटेस्ट व्हर्जनचे एनालाईज करण्यात आले. त्यानुसार Twitter ३ सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च करू शकते. त्यानुसार बेसिक प्लान घेणाऱ्या युजर्सला जास्त ऍड आणि स्टॅंडर्ड प्लान साठी कमी ऍड बघायला मिळतील. परंतु प्रीमियम सबस्क्रीप्शन घेणाऱ्या युजर्सला जाहिराती बघायला मिळणार नाही.