आता Uber वरून बुक करू शकता हॉट एअर बलून राइड

टाइम्स मराठी । बेस्ट कॅब बुकिंग सुविधा प्रदान करणारी कंपनी म्हणजेच Uber . या Uber कंपनीच्या माध्यमातून आपण कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी कॅब बुक करत असतो. Uber च्या माध्यमातून कॅब बुक करणे हे अतिशय सोपे आणि सिक्युअर आहे. आता याच Uber च्या माध्यमातून हॉट एअर बलून राईड देखील बुक करता येऊ शकते.  ही सुविधा तुर्की येथील युजरसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.  या सर्विसच्या माध्यमातून लवकरच ग्राहकांना हॉट एअर बलून राईट बुक करता येईल. उबरने सध्या तुर्कीतील कप्पाडोसिया येथील युजर्स ला राईट बुक करण्यासाठी चान्स दिला.

   

ब्ल्यूम बर्ग यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, उबर ॲप च्या माध्यमातून हॉट बलून राईड बुक करण्यासाठी ग्राहकांना वेगवेगळ्या टाइमिंग प्रमाणे चार्ज करावे लागणार आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला 1.50 तासासाठी 159 डॉलर चार्ज करावे लागतील. म्हणजेच भारतीय करन्सीनुसार 13,200 रुपये प्रति 1.50 तास ग्राहकांना द्यावे लागतील. सध्या ही सर्विस भारतात सुरू करण्यात आलेली नसून तुर्की मधील ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

तुर्की येथील कपाडोसिया हे ठिकाण जगातील फेमस ठिकाण आहे. या ठिकाणी बरेच ग्राहक बलून राईडच्या माध्यमातून प्रवास करतात. या ठिकाणी गुफा, जुने चर्च हे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर टॉप टुरिस्ट अट्रॅक्शन पैकी हे एक ठिकाण आहे. 2022 मध्ये 44.6 मिलियन विजिटर पैकी दहा टक्के व्यक्ती हे सीजन मध्ये फिरायला आले होते. या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून रायडींगचा अनुभव ग्राहक घेतात. आता या ठिकाणी ही रायडींग बुक करण्यासाठी उबरचा वापर करण्यात येऊ शकतो.