टाइम्स मराठी टीम । तूम्ही एलियन आणि UFO बद्दल ऐकले असेल. खरच एलियन आहे का हे आपल्याला विचारल्यावर सांगता येऊ शकत नाही. मात्र अंतराळ खूप मोठे आहे अन त्यामध्ये पृथ्वीसारखा एखादा ग्रह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैज्ञानिकांच्या मते यूफो म्हणजेच परग्रहवासी अस्तित्वात आहेत फक्त आपल्याला त्यांचा शोध लागलेला नाही. वैज्ञानिकांची मोठी टीम यावर काम करत आहेच परंतु हे सुरु असताना अनेकदा युफोबाबतच्या हादरून सोडणाऱ्या बातम्या वेगवेगळ्या देशांतून येत असतात. आता वैमानिक आणि युफो यांच्या आकाशातील झटापटीच्या अशाच एका बातमीमुळे खळबळ माजली आहे.
एका डॉक्युमेंट्री मध्ये आश्चर्यकारक दावा करण्यात आला आहे. यामध्ये दोन फायटर पायलटानी UFOs ला मारण्याचा प्रयत्न केला परंतु UFO मरू शकत नाही. हा दावा जर खरा असेल तर तो अविनाशी म्हणजेच ज्याचा अंत होऊ शकत नाही असा आहे. या दाव्यानुसार त्या UFO वर कोणत्याच शस्त्रांचा वार होऊ शकत नाही. त्याचबरोबर सैनिकांनी केलेल्या दाव्या नुसार UFO प्रत्येक हल्ल्याला तोंड द्यायला तयार आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार, त्या पायलटाने सांगितलं की, त्याने आगीची भिंत बघितली, जी रहस्यमय उडणाऱ्या वस्तूच्या समोर येणारी कोणतीही गोष्ट थांबवण्याचे काम करत होती. जेव्हा UFO च्या दिशेने मिसाईल टाकले तेव्हा प्रत्येक क्षेपणास्त्र तो स्वतःमध्ये शोषून घेत होता. त्याचबरोबर 50 मैल अंतरापर्यंत जोरदार पाठलाग करण्याचे काम त्याने केले.
पायलटच्या म्हणण्यानुसार, त्याने UFO ला मारून टाकण्यासाठी प्रयत्न केला. त्याने सांगितल्याप्रमाणे जेट कंट्रोल जॅम झाले होते. पण तेथून UFO गायब झाल्यानंतर तो पुन्हा कामाला लागला. त्याने हवेतच UFO नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर फक्त 8,000 मैल अंतर कापले. नॅशनल जिओग्राफिकच्या ‘इन्व्हेस्टिगेटिंग द अननोन’ या माहितीपटात वैमानिकांच्या या लढायांची माहिती देण्यात आली आहे. याआधी असा दावा करण्यात आला होता की, UFO 50 मिनिटे प्रवाशाचा पाठलाग करत होता. यूएफओ विमान अलास्कामध्ये उतरल्यानंतर अचानक बेपत्ता झाले.