Ulefone Armor 24 : 22000 mAh बॅटरी असलेला Mobile लाँच; फुल्ल चार्ज केल्यावर 7 दिवस चालणार

टाइम्स मराठी । चायनीज टेक कंपनी Ulefone ने Ulefone Armor 24 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या मोबाईलचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल 22,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे हा मोबाईल इमर्जन्सी लाइट सिस्टम म्हणूनही काम करू शकतो. आज आपण या मोबाईलचे अन्य फीचर्स, त्याचा कॅमेरा, स्टोरेज याबाबत संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

   

6.78 इंचचा डिस्प्ले – Ulefone Armor 24

Ulefone Armor 24 या स्मार्टफोनमध्ये गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शनसह 6.78 इंच चा फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेट सह येतो एवढेच नाही तर हा स्मार्टफोन IP68 रेटिंग सह लॉन्च करण्यात आला. म्हणजेच डस्ट अँड वॉटर रेसिस्टन्ससह हा मोबाईल लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये आयफोन 15 मध्ये देण्यात आलेल्या ॲक्शन बटन प्रमाणे साईड बटन देण्यात आले आहे. या बटनच्या माध्यमातून रियर लॅम्प ब्राईटनेस तीन लेवलमध्ये कंट्रोल करता येते.

Ulefone Armor 24 या स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून 1000 lumens ब्राईटनेस वाली एलईडी लाईट देण्यात आली आहे. यासोबतच कंपनीने यामध्ये कॅमेरा देखील उपलब्ध केला आहे. जेणेकरून कॅपिंगसारख्या गरजांसाठी हा स्मार्टफोन स्पेशल ठरेल. कंपनीने स्मार्टफोनच्या मजबुतीकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले आहे. त्यासाठी IP69k आणि मिलिटरी ग्रेड MIL STD 810H सर्टिफिकेशन देखील देण्यात आले आहे.

Ulefone Armor 24 मध्ये कंपनीने मिडियाटेक हिलियो G96 प्रोसेसर दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, पाठीमागील बाजूला 64 मेगापिक्सेलचा वाईल्ड अँगल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा सेटअप नाईट विजनला सपोर्ट करतो. यामध्ये IR ब्लास्टर आणि NFC कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे.

Ulefone Armor 24 हा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये उपलब्ध आहे. यासोबतच एक्स्ट्रा स्टोरेजसाठी वर्चुअल रॅम देखील वाढवता येईल. कंपनीने या मोबाईल मधील 22000 mAh बॅटरी 66 W फार चार्जिंगला सपोर्ट करते. आणि फुल चार्ज झाल्यानंतर ७ दिवसांपर्यंत बॅकअप देखील देते. यूजर्स हा स्मार्टफोन पॉवर बँक प्रमाणे देखील वापरू शकतात.