Ultraviolette F77 Space Edition । संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून असलेले भारताचे चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर पोचले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला असून जागतिक पाळतीवर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर संपूर्ण भारतात आनंद साजरा करण्यात येत आहे. चंद्रयानाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू व्हीलर स्टार्टअप अल्ट्राव्हायोलेट ऑटोमॅटिक या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक बाइक F77 चे नवीन स्पेस एडिशन लॉन्च केले आहे. आज आपण या गाडीचे फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
Ultraviolette F77 space edition परफॉर्मन्स
Ultraviolette F77 space edition या इलेक्ट्रिक बाइक मध्ये 40.5 bhp पावर देणारी मोटर उपलब्ध असून ही मोटर 100 nm पीक टॉर्क जनरेट करते. यासोबतच कंपनीने या बाईकमध्ये 10.3 kwh क्षमता असलेली बॅटरी पॅक दिलेला आहे. ही बॅटरी सिंगल चार्ज मध्ये 360 km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. या बाईकची टॉप स्पीड 152 किलोमीटर प्रति तास एवढी आहे. यासोबतच 2.9 सेकंदामध्ये 60 किलोमीटर प्रति तास मायलेज देते. कंपनीने ही गाडी 5.60 लाख रुपयांत लाँच केली आहे.
चंद्रयान मिशन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञांच्या आणि इस्रोच्या परिश्रमांच्या सन्मानार्थ ही Ultraviolette F77 space edition इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की या बाईकच्या फक्त दहा युनिट तयार करण्यात आलेल्या असून या बाईकचे बुकिंग सुरू सुद्धा करण्यात आले आहे.
Ultraviolette F77 space एडिशन डिझाईन आणि लुक
Ultraviolette F77 Space Edition या बाईकला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी या बाईकचा लुक आणि डिझाईन मध्ये कॉस्मेटिक चेंजेस करण्यात आले आहे. यामध्ये पेंट स्कीम आणि नवीन ग्राफिक्स वापरण्यात आल्यामुळे F77 स्पेशल मॉडेल सारखी दिसते. कंपनीने सांगितले की, Ultraviolette F77 space edition या बाईक मध्ये एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. ॲल्युमिनियम 7075 हे एक हाय डेन्सिटी मटेरियल असून वजनाला हलका आहे. परंतु याची ताकत ही बऱ्याच स्टीलच्या बरोबर असेल. या ॲल्युमिनियम चा वापर सहसा विमानांमध्ये केला जातो. त्याच प्रकारे या बाईकमध्ये देखील याचा वापर करण्यात आला आहे.
एयरोस्पेस ग्रेड पेंट– Ultraviolette F77 Space Edition
या बाईकला अप्रतिम लूक देण्यासाठी सर्वसाधारण पेंटच्या ऐवजी एयरोस्पेस ग्रेड पेंट वापरण्यात आला आहे. हा पेंट्स स्थायी आणि सुरक्षित असून या पेंटची हाय क्वालिटी पूर्णपणे गंजरोधक आहे. तसेच या पेंट मुळे स्मूथ फिनिशिंग देखील येते. आणि या सोबतच कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तिचे अस्तित्व टिकून ठेवते. Ultraviolette F77 Space Edition या इलेक्ट्रिक बाइक मध्ये ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स बेस्ट टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. यामध्ये बॅटरी सोबतच बऱ्याच रूप सिस्टीम देखील सहभागी आहेत. एखाद्या आपत्कालीन सिच्युएशन मध्ये देखील ही बाईक चांगला परफॉर्मन्स देते.