आजपासून ‘या’ UPI ID होणार बंद!! ऑनलाईन पैसे पाठवता येणार नाहीत

टाइम्स मराठी । मित्रानो, सध्याचे जग हे डिजिटल जग आहे. तंत्रज्ञान खूप पुढे गेलं असून माणसाचे जीव सोप्प झालं आहे. डिजिटल इंडियामुळे आपल्याला खिशात पैसे घेऊन फिरण्याची सुद्धा गरज नाही. UPI ID च्या माध्यमातून Google Pay, PhonePe वरून आपण अगदी काही सेकंदात कोणालाही पैसे पाठवू शकतो किंवा कोणाकडून सुद्धा पैसे घेऊ शकतो. परंतु तुम्हाला माहित आहे का? आजपासून देशातील काही लोकांच्या UPI ID बंद होणार आहेत. होय हे खरं आहे. ज्या लोकांनी मागील वर्षभरापासून आपल्या UPI ID चा वापर केलेला नाही अशा व्यक्तींच्या UPI ID सरकार बंद करणार आहे. त्यामुळे या लोकांना एकमेकांना पैसे पाठवता येणार नाहीत.

   

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जारी केलेल्या परिपत्रकानूसार, एक वर्षापासून ज्या UPI ID ऍक्टिव्हेटच नव्हत्या त्या सर्व 31 डिसेंबर 2023 पासून बंद करण्यात येतील. ज्यांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी कोणतेही आर्थिक (डेबिट किंवा क्रेडिट) किंवा गैर-आर्थिक व्यवहार केले नाहीत त्या ग्राहकांचा फोन नंबर आणि UPI नंबर ओळखणे TPAP आणि PSP बँकांनी आवश्यक आहे, असेही NPCI ने म्हंटल आहे.

का घेण्यात आला आहे हा निर्णय –

सध्या जग जस जस पुढे जात आहे तस तस ऑनलाईन फ्रॉड आणि फसवणुकीचे प्रमाण सुद्धा वाढलं आहे. अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना मोबाईल नंबर लिंक न करताच UPI ​​आयडी तयार करतात. यामुळे त्या जुन्या आयडीचा वापर करून कोणीही फसवणूक करण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी भविष्य घडू नये साठीच NPCI ने पाऊल उचललं आहे. त्यामुळे नव्या वर्षात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल.