Upcoming Cars In India : Tata पासून ते Audi पर्यंत, ऑगस्टमध्ये लाँच होणार ‘या’ दमदार Cars

Upcoming Cars In India । आजपासून ऑगस्ट महिना सुरु झाला असून या महिन्यामध्ये भारतीय ऑटो बाजारात टोयोटा, टाटा मोटर्स, वोल्वो, मर्सिडीज आणि ऑडी यासारख्या कंपन्या कार लॉन्च करणार आहेत. या कार CNG, SUV यासह 7 सीटर MPV आणि इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये बाकीच्या कारला टक्कर देणार आहे. त्यामुळे भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी ऑगस्ट महिना हा शानदार जाऊ शकतो. चला आज आपण जाणून घेऊयात ऑगस्ट महिन्यात कोणकोणत्या गाड्या लाँच होणार आहेत.

   
TATA Punch CNG

1) TATA Punch CNG-

टाटा मोटर्सची TATA Punch CNG या कारची कार्स लव्हर मोठ्या प्रमाणात वाट पाहत आहेत. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये (Upcoming Cars In India) ही कार लॉन्च होऊ शकते. TATA Punch हे टाटा मोटर्सचे चौथे सीएनजी मॉडेल असणार आहे. TATA punch या कारच्या पेट्रोल मोड मध्ये 86hp पावर इंजन देण्यात आलेले असून ते 113nm पिक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर TATA punch CNG या कार मोडमध्ये 77hp इंजन देण्यात आलेले असून 97 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देखील देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यामध्ये एक स्पीड टॅंक सेटअप देण्यात आलेला असून या कारच्या बूट फ्लोअर मध्ये टॅंक बसवण्यात आला आहे. या टॅंक ची क्षमता 30 लिटर एवढी असून रेगुलर व्हेरिएंटला 366 लिटर बूट स्पेस मिळण्याची शक्यता आहे. या कार मध्ये 1.2 लिटर बाई-फ्युल पेट्रोल इंजिनची पॉवर मिळू शकते.

Mersedes Benzo GLC

2) Mersedes Benzo GLC-

Mersedes Benz GLC ही कार सेकंड जनरेशन कार असून भारतामध्ये ऑगस्ट महिन्यात लॉन्च करण्यात येणार आहे. तुम्ही ही कार 1.5 लाख रुपये टोकन रुपये देऊन बुक करू शकतात. यामध्ये NTG 7 टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आलेली असून ही स्क्रीन कारला डिजिटली ॲडव्हान्स आणि इंटेलिजंट बनवते. या कारच्या केबिनमध्ये 12.3 इंच चा इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले देण्यात आलेला असून 11.9 इंच चा पोर्ट्रेट इन्फोटेनमेंट दिसते देखील उपलब्ध आहे. यासोबतच HUD, एक पॅनोरेमिक सनरूप आणि 15 स्पीकर वाला एक बर्मेस्टर ऑडिओ सिस्टीम देखील देण्यात आले आहे. ही कार अपडेटेड डिझाईन सह ए एम जी स्पेक स्पोर्टी कॉस्मेटिक पॅक, क्लीनर एलईडी लाईट, 18-20 इंच आकाराचे अलॉय व्हील देण्यात आले आहे. त्याचबरोबर या कारला 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.0 डिझेल इंजन ऑप्शनसह लॉन्स करण्यात येऊ शकते.

Toyota Rumion

3) Toyota Rumion- (Upcoming Cars In India)

टोयोटा किर्लोस्कर मोटर यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आपली रुमियन लॉन्च करणार आहे. ही कार मारुती सुझुकी अर्टिगाचा रि बेंज वर्जन असेल. या कारमध्ये 1.5 लिटर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलेले असून हे इंजिन 103 बीएचपी आणि 138 nm पीक टॉक जनरेट करते. या इंजिनला 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आणि 6 स्पीड एटी देण्यात आले आहे. Toyota Rumion मध्ये बाय फ्युल सीएनजी ऑप्शन देखील उपलब्ध आहे.

Audi Q8 E tron

4) Audi Q8 E tron-

ही इलेक्ट्रिक कार 18 ऑगस्ट ला लॉन्च होऊ शकते. या बाईच्या डिझाईन मध्ये नवीन मोनोक्रोम 2D लोगो दोन्ही बाजूंनी देण्यात आलेला आहे. या कारच्या केबिनमध्ये 16 स्पीकर बॅग ओल्फसेन साऊंड सिस्टिम, मसाज आणि मेमरी फंक्शन सह व्हेंटिलेटर फ्रंटसीट, पॅनोरमिक सनरूप, 360 डिग्री कॅमेरा, 10.1 इंच चा मेन इन्फोटेड स्क्रीन आणि एचवीएसी कंट्रोल करण्यासाठी दुसरी स्क्रीन देण्यात आली आहे. त्याचबरोबर या कारमध्ये 114 kwh बॅटरी पॅक देण्यात आलेला असून ही बॅटरी फुल चार्जिंग वर 500 किलोमीटर पर्यंत रेंज देते. त्याचबरोबर या बॅटरी मध्ये ड्युअल मोटर सेटअप देखील देण्यात आलेले असून हे मॉडेल 408 बीएचपी पॉवर सह 664 nm टॉर्क जनरेट करते.

Hyundai Creta and Adventure Edition

5) Hyundai Creta and Adventure Edition-

ऑगस्ट महिन्यामध्ये हुंडाई क्रेटा आणि अल्काजार चं एडवेंचर एडिशन लॉन्च होऊ शकतो. हे पॉप्युलर मिड साइज एसयुव्ही चं लिमिटेड एडिशन असेल. त्याचबरोबर ही कार रेंजर खाकी कलर मध्ये लॉन्च करण्यात येणार असून या कारचे इंटेरियर ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध असेल. या कारच्या इंजिन बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे. या कार मध्ये फ्रंट आणि रियर बंपर, विंग मिरर, रूफ रेल्स आणि अलॉय व्हील्स वर ब्लॅक आऊट ट्रीटमेंट मिळू शकते.

Volvo C40 Recharge

6) Volvo C40 Recharge-

ऑगस्ट महिन्यामध्ये लॉन्च होणाऱ्या कार्स मध्ये या काळसादेखील समावेश आहे. ही इंडिया मधील कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक कार असेल. या कारमध्ये 78 kwh बॅटरी पॅक देण्यात आलेला असून एकदा चार्ज केल्यावर ही कार 530 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज देते. या कारची किंमत ऑगस्ट महिन्यातच समजू शकते