‘या’ तारखेपर्यंत अपडेट करा आधार कार्ड, अन्यथा भरावा लागेल दंड

टाइम्स मराठी । आजकाल आधार कार्ड (Aadhar Card) प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आपण बऱ्याचदा आधार कार्ड आपलं ओळखपत्र म्हणून दाखवतो. काही सरकारी योजना, बँक केवायसी, ऍडमिशन, या सर्व गोष्टींसाठी आधार कार्डची गरज असते. आधार कार्ड शिवाय हे काम होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? काही काळानंतर आधार कार्ड एक्सपायर होते म्हणजे आधार कार्ड ची व्हॅलिडीटी डेट संपते. त्यावेळी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जुने असेल तर सरकारने आता तुमच्यासाठी खास योजना सुरू केली आहे. जेणेकरून तुम्ही तुमचे आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करू शकतात.

   

आधार कार्ड अपडेट करणे याबाबत सरकारकडून प्रत्येक वेळेस सूचना जारी केल्या जातात. तरीही बरेच जण आधार कार्ड अपडेट करत नाही. आणि नंतर त्यांना कोणत्याही कामाला अडचण येते. जर तुम्ही देखील बऱ्याच वर्षांपासून म्हणजेच दहा वर्षांपेक्षा जुने आधार कार्ड अजूनही अपडेट केले नसेल तर सरकारने तुम्हाला आणखीन एक चान्स दिला आहे. जर तुम्हाला दहा वर्षांपेक्षा जुना आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर सरकारने 14 सप्टेंबर 2023 ही तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करू शकतात.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी यापूर्वी देखील अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु लोकांनी याकडे लक्ष दिले नाही. यापूर्वी ही तारीख 14 जून 2023 करण्यात आली होती. परंतु तेव्हा देखील बऱ्याच जणांनी आधार कार्ड अपडेट केले नाही. या तारखेच्या अगोदर एकदा पुन्हा अंतिम तारीख देण्यात आली होती. ही तारीख 15 मार्च 2023 होती. परंतु त्यावेळी दहा वर्षे जुने आधार कार्ड अपडेट केल्यास 25 रुपये दंड भरावा लागणार होता. त्यानंतर लोकांच्या सोयी लक्षात घेता आता हा दंड रद्द करून फ्री मध्ये अपडेट करण्याची माहिती दिली आहे. तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुमच्या जवळच्या जन सुविधा केंद्रात जावे लागेल. जर तुम्ही 14 सप्टेंबर पर्यंत आधार अपडेट केल्यास तुम्हाला दंड भरण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील आधार कार्ड व्हेरिफाय किंवा अपडेट करू शकतात.