1 जानेवारीपासून या लोकांचा UPI ID होणार बंद

टाइम्स मराठी | सध्या डिजिटल मार्केटिंगचे जग आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आर्थिक व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने केले जातात. ऑनलाइन पद्धतीने  पेमेंट करण्यासाठी प्रत्येक स्मार्टफोनमध्ये  Google pay, Phone Pay याचप्रकारे UPI हे ऑप्शन देखील उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून छोटे मोठे पेमेंट केले जातात. ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून बरेच जण कॅश बाळगत नाही. भाजीपाला घेण्यापासून ते कॉलेजची फीस भरण्यापर्यंत सर्व ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करतात. परंतु आता लवकरच तुमचा UPI ID बंद होण्याची शक्यता आहे.

   

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI) ने सर्व बँक आणि थर्ड पार्टी ॲप्सला याबाबत निर्देश दिले आहे. ज्या युजर्सचा UPI ID 1 वर्षापासून इनॲक्टिव्ह आहे, म्हणजेच ज्या युजर्सने UPI ID च्या माध्यमातून 1 वर्षात कोणताही व्यवहार केलेला नाही अशी ID बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच आता 31 डिसेंबर नंतर  इनॲक्टिव्ह UPI ID बंद करण्यात येतील.

ईमेल- टेस्ट मेसेजने मिळणार वार्निंग

यासंदर्भात बँक किंवा थर्ड पार्टी ॲप म्हणजेच google pay , phone pay च्या माध्यमातून युजर्स ला ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज पाठवण्यात येईल. त्यानंतर देखील युजर्स ने कोणतीच ॲक्शन घेतली नाही तर UPI ID बंद करण्यात येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन NPCI ने घेतलेला हा निर्णय  UPI  व्यवहार जास्त सुरक्षित बनवण्यासाठी घेतला आहे. बऱ्याचदा वेगवेगळ्या मोबाईल नंबर च्या माध्यमातून युजर्स UPI ID तयार करत असतात. परंतु मोबाईल नंबर चेंज झाल्यानंतर जुना UPI ID बंद करणे राहून जाते. 

या पद्धतीने UPI ID करा ऍक्टिव्ह

तुम्हाला देखील तुमच्या UPI ID संदर्भात मेसेज आला असेल किंवा तुम्ही देखील एक वर्षापासून तुमच्या UPI ID वरून पेमेंट केले नसेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने अकाउंट ॲक्टिव्ह करू शकतात. त्यासाठी तुम्हाला सोपी पद्धत वापरावी लागेल. ही पद्धत म्हणजे तुम्हाला तुमच्या आयडीवरून एखाद्या व्यक्तीला पेमेंट पाठवावे लागेल.  किंवा ट्रांजेक्शन करावे लागेल. जेणेकरून तुमचे इन ॲक्टिव्ह UPI ID ऍक्टिव्ह होईल.