आता UPI पेमेंटसाठी Mobile ची गरज नाही; ही Ring च करेल पैशाचा व्यवहार

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल बँकिंगचे युग सुरू असून मोबाईलच्या (Mobile) माध्यमातूनच ऑनलाइन पद्धतीने (Online Payment) पेमेंट केले जाते. पूर्वी आपण कॅश देऊन व्यवहार करत होतो. आता ही कॅश सुविधा थोड्या प्रमाणात कमी होऊन त्यानंतर आपण कार्ड च्या माध्यमातून पेमेंट करायला सुरुवात केली. परंतु कार्ड प्रत्येक ठिकाणी चालत नसल्यामुळे Google Pe, Phone Pe, UPI या सुविधा उपलब्ध झाल्या. त्यानुसार आपण मोबाईलच्या माध्यमातूनच पेमेंट करू लागलो. म्हणजेच कॅशलेस सुविधा उपलब्ध झाल्या. परंतु आता पेमेंट करण्यासाठी मोबाईलची गरज सुद्धा लागणार नाही. नवीन टेक्नॉलॉजीनुसार आता डिजिटल रिंगच्या माध्यमातून पेमेंट केले जाऊ शकते. म्हणजेच आता मोबाईल शिवाय पेमेंट ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

   

केरळ येथील तिरुवनंतपुरम या ठिकाणी एसी मनी या स्टार्टअप कंपनीने हा ऑप्शन देशासमोर मांडला आहे. या ऑप्शनच्या माध्यमातून मोबाईल न वापरता तुम्ही UPI पेमेंट करू शकतात. यासाठी डिजिटल अंगठी असणे गरजेचे आहे. म्हणजेच कोठेही जाताना आपण मोबाईल घरी विसरलो तरी देखील कोठेही ऑनलाईन पेमेंट करू शकतो. आजकालच्या जगामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना मोबाईल फोन वापरणे एवढे महत्त्वाचे वाटत नाही. आणि ते मोबाईल फोन वापरत देखील नाही. अशा व्यक्तींसाठी एसी मनी कंपनीने आणलेला हा पेमेंटचा नवीन पर्याय खास आहे. म्हणजेच तुम्ही मोबाईल न वापरता डिजिटल रिंगच्या (Ring) माध्यमातून UPI मोडमध्ये पेमेंट करू शकतात.

देशाला डिजिटल इंडिया (Digital India) चा एक भाग बनवण्याबरोबरच मोबाईलची सक्ती कमी करणे हा या कंपनीचा उद्देश आहे. आज-काल मोबाईल अन्न वस्त्र निवाऱ्याप्रमाणेच गरजेचा बनला आहे. आणि मोबाईल शिवाय कोणतेच काम शक्य होत नाही. यामुळे सर्वजण मोबाईलवर अवलंबून झाले आहेत. थोड्याफार प्रमाणात मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी कंपनीने हा उपाय उपलब्ध करून दिला आहे. एवढेच नाही तर कंपनीने ट्रांजेक्शन ची मर्यादा ही लाखो रुपयांपर्यंत ठेवली आहे.

एसी मनी या कंपनीने बऱ्याच संशोधनानंतर ही रिंग बनवली आहे. जेणेकरून तुमच्या खिशात पैसे किंवा मोबाईल नसेल तरीदेखील तुम्ही पेमेंट करू शकतात. हे रिंग बनवण्यासाठी झिरकोनिया सिरॅमिक वापरण्यात आले आहे. ही रिंग दिसायला सर्वात छोटी असून या रिंग चा डिस्प्ले गोरिला ग्लास ने सुसज्ज आहे. म्हणजेच त्यावर कोणताही स्क्रॅचचा परिणाम होत नाही. आणि ही रिंग वापरण्यासाठी मोबाईलची गरज देखील भासत नाही. या रिंगच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी हे रिंग फक्त पेमेंट टर्मिनल वर ठेवावी लागते. आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यापूर्वी बीपचा आवाज येतो. सध्या तरी सर्वसामान्य व्यक्तींसाठी हे उपलब्ध करण्यात आलेले नसून शासनाने अजूनही यासाठी मान्यता दिली नाही.