UPI Payment : UPI पेमेंट करताना बाळगा सावधगिरी; अन्यथा होईल नुकसान

UPI Payment : आज काल ऑनलाईन पद्धतीने सर्व कामे होत असतात. यासोबतच डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून सर्वजण ऑनलाइन पेमेंट करतात. यासाठी वेगवेगळे ॲप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी Google Pay, Phone Pay, Paytm, UPI  यासारखे बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत. UPI पेमेंटच्या माध्यमातून आपण सिक्युअर पेमेंट करू शकतो. परंतु आज-काल सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे ऑनलाइन पेमेंट करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. या काही गोष्टी सर्वांनी महत्त्वपूर्ण लक्षात घेतल्या पाहिजे.

   

1) विचार करून पेमेंट करा

ऑनलाइन पेमेंट करत असताना आपण कोणताही विचार न करता पेमेंट करत असतो. परंतु बऱ्याचदा यूपीआय कोड चुकीचा असल्यामुळे आपल्याला परेशानीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कधीही लक्ष देऊन आणि विचार करूनच पेमेंट करणे गरजेचे आहे. म्हणूनच कधीही यूपीआय कोड, स्कॅनर हे पुन्हा चेक केले पाहिजे. पेमेंट करत असताना ज्या नंबर वर आपण पेमेंट (UPI Payment) करणार आहे. तो नंबर पुन्हा पुन्हा चेक करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा चुकीच्या नंबर वर पेमेंट केल्या जाते. आणि चुकीच्या नंबर वरून गेलेले पैसे मिळवण्यासाठी बरीच प्रोसेस करावी लागते.

२) पेमेंट आकडे चेक करणे- UPI Payment

UPI Payment करताना तुम्हाला संपूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा पेमेंट करताना आपल्याकडून चुकून जास्तीचे आकडे टाकले जातात.  त्यामुळे समोरच्या व्यक्तीला जास्त पैसे अकाउंट मधून जातात. आणि पेमेंट केलेला व्यक्ती हे मानण्यास तयार होत नाही.  यापासून वाचण्यासाठी तुम्ही पेमेंट करताना टाकलेले आकडे तपासणे गरजेचे आहे.

३) सायबर फ्रॉड पासून वाचा

सध्या ऑनलाईन डिजिटल बँकिंगचं जग असल्यामुळे सायबर चोरी किंवा ऑनलाइन चोरीचे प्रकार प्रचंड वाढले आहे. ऑनलाइन पद्धतीने शॉपिंग करणे, मोबाईल नंबर वरून कॉल आल्यास त्यांना अकाउंट नंबर  सांगणे, धमकीचे फोन येणे, या गोष्टीमुळे एका OTT वर, तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकते. त्यामुळे यूपीआय स्कॅम (UPI Scam) पासून वाचणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा आपण ऑनलाइन पेमेंट ॲप डाउनलोड करतो तेव्हा  आपण डाऊनलोड करत असलेले सिक्युअर आणि थर्ड पार्टी तर नाही ना याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे कधीही यूपीआय पेमेंट करणे सुरक्षित  आहे.

४) अँप अपडेट करा

यूपीआय वेगवेगळ्या प्रकारचे  सिक्युरिटी ऑप्शन आपल्याला देत असते. या ऑप्शनच्या माध्यमातून आपण आपले UPI अँप सिक्युअर करू शकतो. एवढेच नाही तर आपण UPI पिन, फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन या ऑप्शन नुसार सिक्युरली पेमेंट करू शकतो. यासोबतच तुमचे ॲप अपडेट करणे देखील गरजेचे आहे.  जर तुम्ही तुमचे ॲप अपडेट ठेवत असाल तर तुमच्या ॲप मध्ये कोणताही बग्ज येणार नाही.

५) ट्रांजेक्शन हिस्ट्री चेक करणे

UPI Payment केल्यावर किंवा एखाद्या वेळी ट्रांजेक्शन हिस्टरी चेक करणं गरजेचं असतं. कारण आपण कोणाला पेमेंट केलेलं आहे किंवा आपल्या अकाउंट वरून कोणी पेमेंट केलेलं असेल तर ते आपल्याला लगेच कळू शकेल. त्यामुळे आपण करत असलेल्या ट्रांजेक्शन वर आपली नजर असणे गरजेचे आहे.

५) ट्रांजेक्शन लिमिट

ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी ट्रांजेक्शन लिमिट देखील आपण सिलेक्ट करू शकतो.  त्यानुसार आपण एका दिवसात किती ट्रांजेक्शन करू शकतो याबाबत आपल्याला माहिती मिळेल. ट्रांजेक्शन लिमिट च्या माध्यमातून आपण दिवसाला पाच किंवा सात ट्रांजेक्शन करू शकतो. ही लिमिट आपण आपल्या पद्धतीने ठेवू शकतो. म्हणजेच आपल्या खर्चावर आणि पेमेंट वर देखील बंधन राहतील.