UPI Payment : चुकीच्या UPI वर पैसे पाठवले? घाबरू नका, अशा प्रकारे मिळतील परत

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल इंडियाकडे भारताची वाटचाल सुरु आहे. आजकाल ऑनलाइन ट्रांजेक्शनच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करणे सर्वांनाच आवडते. यामुळे सोप्या पद्धतीने एका क्लिक एकमेकांना पैसे पाठवले जात आहेत. UPI च्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांचा (UPI Payment) आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतासोबतच विदेशामध्ये देखील UPI पेमेंट वापरले जाते. ऑनलाईन पैसे सेंड करत असताना बऱ्याचदा आपल्याकडून घाई गडबडीत चुकीच्या नंबर वर ट्रांजेक्शन केलं जाते. आणि आपले पैसे अनोळखी व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जमा होतात. अशा परिस्थितीत घाबरून न जाता आपण आपले पैसे परत मिळवू शकतो. कसे ते आज आम्ही तुम्हाला सांगतो.

   

तक्रार नोंदवावी लागेल- UPI Payment

जर तुम्ही Phonepe Google pay , PayTM या कोणत्याही ॲपच्या माध्यमातून पेमेंट केलं असेल तर तुम्हाला कस्टमर सर्विसवर जाऊन तक्रार नोंदवावी लागेल. त्याचबरोबर तुम्ही ज्या नंबरवर चुकून ट्रांजेक्शन केलेलं आहे त्या नंबरवर कॉल करून तुमचे पैसे परत मागू शकतात. पण समोरच्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिल्यास तुम्ही RBI च्या नियमानुसार बँकेकडे आणि RBI कडे तक्रार करू शकतात. त्याचबरोबर जर त्या व्यक्तीने ट्रांजेक्शन केलेले पैसे काढून घेतलेले असतील तर RBI सोबतच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे देखील तुम्ही तक्रार करू शकतात. जर तुम्ही QR कोड ने ट्रांजेक्शन केलेलं असेल तर तुम्हाला बँकेत संपर्क करावा लागेल.

या नंबर वर करू शकतात तक्रार

RBI कडे तुम्ही चुकीचा नंबर वर पैसे ट्रांजेक्शन केल्याची तक्रार नोंदवण्यासाठी कोणतीही किचकट प्रोसेस नसून साधारण प्रोसेस ने जाऊन तुम्ही तुमचे पैसे रिफंड करू शकतात. जर तुम्ही UPI वरून पैसे (UPI Payment) चुकीच्या नंबर वर ट्रांजेक्शन केले असेल त्यावेळी तुम्हाला 18001201740 या टोल फ्री नंबर वर कॉल करून तक्रार करावी लागेल. आणि सर्व डिटेल्स द्यावे लागतील. यानंतर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन एक फॉर्म भरून बँक अधिकाऱ्यांना द्यावा लागेल. यानंतर ते तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर किंवा कंप्लेंट नंबर देतील. त्याचबरोबर तुम्ही bankingombudsman.rbi.org.in या ईमेलवर सुद्धा तुमची तक्रार नोंदवू शकता.