जगातील सर्वात लहान Power Bank लॉन्च; जाणून घ्या फीचर्स  

टाइम्स मराठी । जेव्हा आपण प्रवास करतो आणि मोबाईलची चार्जिंग कमी असते किंवा संपते. तेव्हा आपल्याकडे पावर बॅंकचा पर्याय असतो. या पावर बँक च्या मदतीने आपण मोबाईल फोन चार्ज करू शकतो. भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या पावर बॅंक उपलब्ध आहेत. आता आणखीन एक पावर बँक  मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलाय. चार्जिंग सोल्युशन ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या URBN कंपनीने जगातील सर्वात लहान पॉवर बँक लॉन्च केले आहे. या पावरबँकचे नाव URBN Nano Power Bank असून हे पावरबॅंक दोन वेगवेगळ्या क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने हे दोन्ही पावरबँक अँड्रॉइड आणि आयफोन युजर साठी लॉन्च केले आहे. आज आपण जाणून घेऊया या पावरबँकचे फीचर्स.

   

फिचर्स

20,000 mah बॅटरी असलेली अर्बन नॅनो पावर बँक 22.5 W चार्जिंग स्पीड प्रदान करते. यामध्ये ट्रिपल पोर्ट डिझाईन देण्यात आली आहे. या पावरबँक सोबत 1 USB A आणि 2 USB C पोर्ट उपलब्ध आहे. या ट्रिपल पोर्ट डिझाईन चा वापर तुम्ही एकाच वेळी बरेच प्रॉडक्ट चार्ज करण्यासाठी करू शकतात. एवढेच नाही तर हा पावर बॅंक पास-थ्रू चार्जिंगला देखील सपोर्ट करतो . जेणेकरून युजर्स पॉवर बँक चार्ज होत असताना फोन देखील चार्ज करू शकतात.

बॅटरी चार्ज

10000 mah बॅटरी असलेली पावरबॅंक चार्ज होण्यासाठी 3.5 तास लागतात. आणि 20,000  mah बॅटरी असलेला पावर बॅंक चार्ज करण्यासाठी 7 तास लागतात. या पावर बँकच्या माध्यमातून फक्त मोबाईलच नव्हे तर इयरफोन, वॉच किंवा कमी पावर वाले गॅजेट देखील चार्ज करण्यात येऊ शकतात.

किंमत किती

URBN Nano Power Bank ब्लॅक, केमो, पर्पल यासारख्या बऱ्याच कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या 10,000 mah बॅटरी असलेला पावरबँक 1,649 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. आणि 20000 mah बॅटरी असलेल्या पॉवर बॅंकची किंमत 2,499 ठेवण्यात आली आहे. तुम्ही हे प्रॉडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन क्रोमा आणि  urbnworld.com या वेबसाईटवरून खरेदी करू शकतात. कंपनीने या पॉवर बँक सोबत 1 वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी दिली आहे.