Vastu Tips : घरातील नकारात्मकता दूर करायची असेल तर तुरटीचा करा अशा पद्धतीने उपाय, वास्तुदोष होईल नष्ट!

टाइम्स मराठी | मित्रांनो दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला अनेक शक्ती वास्तव्य करत असतात. काही शक्ती सकारात्मक असतात तर काही नकारात्मक असतात. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा हा प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु जशा जीवनामध्ये चांगल्या घटना घडत असतात, तशा वाईट देखील घडत असतात. आपली वाईट मनस्थिती बदलण्यासाठी आपण घरच्या घरी राहून काही उपाय देखील करू शकतो. वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र व राशि भविष्य शास्त्र या सर्वांमध्ये मानवी जीवन प्रगतीमुळे कसे व्हावे याकरिता काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्या गोष्टींचा जर आपण आपल्या उत्कर्षासाठी उपयोग केला तर आपले जीवन प्रगतीपथावर येऊ शकते. आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊ शकते.

आपल्या सर्वांना तुरटी (Alum)माहिती आहे. तुरटीचा उपयोग घरात प्रामुख्याने केला जातो. तुरटीला वास्तुशास्त्र व अध्यात्म शास्त्रामध्ये देखील महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. तूरटीचा उपयोग करून आपण पाणी देखील शुद्ध करत असतो. आज आपण आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुरटीचा वापर कशाप्रकारे केला जाऊ शकतो याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

तुरटी चे वैज्ञानिक फायदे सांगण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने तुरटी अध्यात्मक शास्त्रामध्ये देखील त्याचे फायदे सांगण्यात आलेले आहे. तुरटीचा वापर करून पाणी स्वच्छता केली जाते पण त्याचबरोबर भाजीपाला, फळे देखील ताजेतवाने ठेवले जाते. तंत्र शास्त्रानुसार देखील तुरटीचे काही फायदे सांगण्यात आलेले आहेत. जर आपल्या कामाच्या ठिकाणी, दुकान व्यवसाय या ठिकाणी कायम नकारात्मकता जाणवत असेल तर अशावेळी काळ्या कपड्यांमध्ये तुरटीचा एक खडा बांधून प्रवेशद्वाराच्या मधोमध वर दरवाजाला हा खडा कपड्यांमध्ये बांधून टांगला जातो. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होते. असे केल्याने कामाच्या ठिकाणी आपल्याला प्रगती देखील पाहायला मिळते तसेच टप्प्याटप्प्याने मानवाची देखील प्रगती होते असे तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे.

जर तुमच्या घरामध्ये वारंवार वाद भांडण होत असतील तर अशावेळी रात्री झोपताना पलंगाखाली एका पेल्यामध्ये आपल्याला तुरटीचे काही खडे पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि सकाळी उठल्यावर हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी टाकायचे आहे, असे केल्याने घरातील वाद हळूहळू कमी होऊ लागतील. सदस्यांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल.

जर जीवनामध्ये तणाव जास्त प्रमाणामध्ये असेल तर अशावेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी मिक्स करून या पाण्याद्वारे आंघोळ करायला हवी. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा तरी तुरटी व मीठ यांच्या मिश्रणाने तयार केलेले पाणी द्वारे आपल्याला घरातील लादी पुसायला हवी, असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही. घरातील सदस्यांना चांगले आरोग्य व मनशांती सुख लाभते. जर तुम्हाला वारंवार नजर लागत असेल तर अशावेळी पायापासून ते डोक्यापर्यंत तुरटी फिरवून तुम्ही ही तुरटी नंतर पाण्यामध्ये टाकून ते पाणी झाडांना वाहायचे आहे, असे केल्याने देखील तुमची नजर उतरून जाईल.