तुम्हीही Toilet मध्ये Mobile वापरताय? आजच सोडा सवय, अन्यथा….

टाईम्स मराठी । मित्रानो, आजकाल मोबाईल म्हणजे अनेकांचा जीव की प्राण झाला आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणे मोबाईल सुद्धा जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मोबाईल वरून अनेक कामे ऑनलाईन करता येत असल्याने ती गरजेची वस्तू बनली आहे. अगदी लहान मुलांपासुन ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड आहे. परंतु आजकल तरुणांमध्ये थेट टॉयलेटला जातानाही मोबाईल घेऊन जाण्याचे फॅड वाढलंय. ऐकायला जरा वेगळं वाटत असलं तरी हे खरं आहे. परंतु टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जाणं आपल्या आरोग्यावर बेतू शकत हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आज आम्ही सांगतोय ते वाचाच ….

   

एका अभ्यासानुसार, 10 पैकी 6 लोक त्यांचा मोबाईल टॉयलेट मध्ये घेऊन जातात. या अभ्यासातील 61.6% लोकांनी कबूल केले की ते टॉयलेट सीटवर बसून त्यांचे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया अकाउंट यूज करत असतात. तसेच जवळपास ३४% हे सध्याच्या चालू घडामोडी बघत असतात आणि २५ टक्के लोक आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना मेसेज पाठवत असतात.

स्मार्टफोनचा अती वापर करणं हे चुकीचं असून टॉयलेट मध्ये फोन घेऊन जाणे हे किटाणूला आमंत्रण देण्यासारख आहे. टॉयलेट सीटमध्ये असलेले बॅक्टेरिया मोबाईलच्या स्क्रीनवर येतात. आपण टॉयलेट वरून आल्यावर आपले हात स्वच्छ करतो पण वॉशरूम मध्ये घेऊन गेलेला मोबाईल स्वच्छ करत नाही. संशोधनात स्पष्ट झालेलं आहे की स्मार्टफोनच्या स्क्रीनवर असलेले किटाणू 28 दिवसांपर्यंत जिवंत राहतात. त्यामुळे टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकत.