आता Mobile नंबर शिवाय वापरा Telegram; ‘या’ Steps फॉलो करा

टाइम्स मराठी । व्हाट्सअप प्रमाणेच टेलिग्राम हे ॲप देखील लोकांच्या पसंतीस उतरलेले आहे. व्हाट्सअप ची प्रायव्हसी पॉलिसी आल्यानंतर याचा सर्वात जास्त फायदा टेलिग्राम या अँप ला मोठ्या प्रमाणात झाला. यानंतर इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून युजर्स टेलिग्राम वापरू लागले. यामध्ये वेगवेगळे फीचर्स दिलेले आहेत. त्याचबरोबर व्हाट्सअप पेक्षा जास्त प्रायव्हसी देखील या अँप मध्ये देण्यात आली आहे. आपण टेलिग्राम वरून जास्त MB ची फाईल शेअर करू शकतो. खासकरून टेलिग्राम चा वापर प्रमोशनल ऑफर कॉपीराइट्स फिल्म, वेब सिरीज पाहण्यासाठी केला जातो. कारण कोणतीही नवीन फिल्म किंवा वेब सिरीज आल्यास टेलिग्राम वर उपलब्ध करून देण्यात येतात.

   

टेलिग्राम हे अँप वापरण्यासाठी मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे लागते. पण तुम्ही मोबाईल नंबर न वापरता देखील टेलिग्राम अँप वापरू शकतात. त्याचबरोबर तुम्ही टेलिग्राम वर लॉगिन साठी टाकलेला मोबाईल नंबर लपवू देखील करू शकतात. त्यासाठी तुम्हाला

काय करावं लागेल ?

नंबर शिवाय टेलिग्राम वापरण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर विकेंद्रीत प्लॅटफॉर्म shard वरून ब्लॉकचेन आधारित अनलोन नंबर खरेदी करावा लागेल.
हा नंबर आणि युजर नेम तुम्ही फ्रेगमेंट साइटवर घेऊ शकता.
नंबर घेतल्यानंतर तुम्हाला टेलिग्राम ॲप डाऊनलोड करावा लागेल.
त्यानंतर गेट स्टार्टेड वर क्लिक करा. यानंतर फ्रेगमेंट साइटवरून खरेदी केलेला नंबर टाका.
यानंतर टेलिग्राम व्हेरिफाय केला जाईल आणि ओटीपी देखील त्यांच्याकडून टाकले जाईल.
व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही टेलिग्राम विना नंबर वापरू शकतात.

टेलिग्राम अँप वर तुम्ही तुमचा नंबर वापरला असेल, आणि तुम्हाला नंबर हाईड करायचा असेल तर खालील पद्धतीने वापरा

  1. सर्वात पहिले तुमचा स्मार्टफोन मध्ये टेलिग्राम ॲप डाऊनलोड करा.
  2. यानंतर साईडला असलेल्या तीन डॉट वर क्लिक करा.
  3. या तीन डॉट वर जाऊन सेटिंग या ऑप्शन वर क्लिक करा.
  4. सेटिंग वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रायव्हसी अँड सिक्युरिटी हे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.
  5. या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. त्यातील फोन नंबर या ऑप्शन वर क्लिक करा.
  6. त्यानंतर Everybody, My contact, Nobody असे तीन ऑप्शन तुम्हाला दिसतील.
  7. तुम्ही Nobody या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर कोणालाही दिसणार नाही. जर तुम्ही My contact वर क्लिक केलं तर तुमचा नंबर सेव्ह असलेल्या लोकांना दिसू शकेल.