पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स

टाइम्स मराठी । सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. या सीझनमध्ये कपडे सुकवण्यासाठी कितीही मेहनत घेतली तरीही कपडे ओले राहतात. त्यामुळे त्याचा वास येतो. त्याचबरोबर ऊन न पडल्यामुळे वातावरणातील आद्रता वाढते. आणि कपडे सुकण्यासाठी बराच वेळ लागतो. अशावेळी प्रत्येकाला ओल्या कपड्यांमुळे त्रास सहन करणे भाग असते. तर आज आपण जाणून घेऊया कपडे सुकवण्याच्या काही शानदार टिप्स. ज्यामुळे आपले कपडे सुकतील आणि त्याचा वास येणार नाही.

   

१) इस्त्रीच्या मदतीने कपडे सुकवणे-

ऊन नसल्यावर पावसाळ्यात ही कपडे सुकवण्याची सर्वात सोपी पद्धत असून यामुळे कपड्यांना इस्त्री देखील केली जाते. आणि कपडे सुकवले जातात. यासाठी तुम्हाला तुमचे कपडे हळूहळू इस्त्री करावे लागतील. पण त्यापूर्वी तुम्हाला कपडे धुऊन त्यातील पाणी काढून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्ही कपडे इस्त्री करू शकतात. परंतु यावेळी तुमच्याकडून चुकूनही इस्त्रीला ओला हात लागू देऊ नका. कारण ओल्या हातामुळे करंट लागण्याची शक्यता जास्त असते. या पद्धती सोबतच तुम्ही वॉशिंग मशीनच्या ड्रायर मध्ये देखील कपडे सुकवू शकतात. त्यानंतर इस्त्री करू शकतात

२) मायक्रोवेव्ह ओवन

ही पद्धत तुम्ही कधीही ऐकली आणि वापरली नसेल. पावसाळ्यात ओले कपडे सुकवण्यासाठी मायक्रोवेव देखील कामात येते. परंतु लहान मुलांचे कपडे सुकवण्यासाठी किंवा छोटे कपडे सुकवण्यासाठी ओव्हन जास्त मदत करू शकते. मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये कपडे सुकवण्यासाठी सर्वात अगोदर कपड्यांमधील पाणी पिळून घ्या. त्यानंतर कपडे बेकिंग शीटवर ठेवून ओव्हन सुरु करा. या पद्धतीने कपडे सुकवण्यासाठी एक काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मायक्रोवेव्ह ओवन मध्ये जास्त वेळ कपडे ठेवू नका. नाहीतर कपडे खराब होतील.

३) हेअर ड्रायर

पावसाळ्यामध्ये कपडे सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा देखील वापर करू शकतात. या हेयर ड्रायर मुळे कपडे लवकर सुकण्यासाठी मदत होते. ही पद्धत वापरण्यासाठी सर्वात अगोदर हेअर ड्रायर हीट मोडवर ठेवा. त्यानंतर कपडे सुकवा. हेअर ड्रायर मधून निघणारी गरम हवा ही ओल्या कपड्यांना सुकवण्यासाठी मदत करू शकते. आणि यामुळे कपड्यांचा वास देखील निघून जातो.