तुमच्याही Mobile चे इंटरनेट Slow चालतंय? ‘या’ ट्रिक वापरून करा उपाय

टाइम्स मराठी| अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे स्मार्टफोन हे देखील आता गरजेचे साधन बनले आहे. आजकाल स्मार्टफोनवरच बरेच कामे केली जातात. त्यामुळे मोबाईल शिवाय घराच्या बाहेर पडणे सहज शक्य होत नाही. यापूर्वी मोबाईल फक्त कॉलिंग आणि गेम यापुरता मर्यादित होता, परंतु आता ऑफिशियल कामे देखील स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जातात. परंतु यासर्व गोष्टींसाठी इंटरनेट खूप महत्वाचे असते. यातच तुमचे इंटरनेट खूप कमी स्पीडने चालत असेल तर तुमचे काम पूर्ण होत नाही.

   

बऱ्याचदा कोणतेही पेज लोड करण्यासाठी, व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी , मेसेज पाठवण्यासाठी जर इंटरनेट चालत नसेल तर अडचणी येतात. आणि आपण इंटरनेट साठी सिम कार्ड चेंज करण्याचा पर्याय निवडतो. परंतु आम्ही तुम्हाला आज काही ट्रिक्स सांगणार आहोत. या ट्रिक्स च्या माध्यमातून तुमचे इंटरनेट स्पीड मध्ये चालू शकेल.

1) VOLT वोयस ओवर LTE इनेबल करा

तुमच्या स्मार्टफोन मध्ये सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला VOLT वोयस ओवर LTE हे ऑप्शन दिसेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही इनेबल करू शकतात. VOLT वोयस ओवर LTE च्या माध्यमातून तुम्ही तुमची कॉल कॉलिटी सुधारू शकतात. आणि इंटरनेट सुविधा देखील परफेक्ट बनवू शकतात.

2) नेटवर्क सेटिंग

तुमच्या मोबाईलची नेटवर्क सेटिंग आणि डाटा सेटिंग तपासा. यामध्ये काही अडचण असल्यास नेटवर्क मध्ये अडथळा येतो. तुमच्या मोबाईल मध्ये नेटवर्क सेटिंग ऍडजेस्ट करण्याचा ऑप्शन दिला जातो. त्याच्या माध्यमातून तुम्ही ही सेटिंग करू शकतात. जर तुमचा मोबाईल 4g किंवा 5g वर काम करत असेल तर तुम्ही त्या प्रकारे नेटवर्क सेट करू शकतात.

3) मोबाईल रिस्टार्ट करा

बऱ्याचदा मोबाईल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बग येतात. किंवा ग्लीच देखील येतात. अशावेळी नेटवर्क इशू मोठ्या प्रमाणात होतो. अशावेळी तुम्ही तुमचा मोबाईल रिस्टार्ट करू शकतात. यामुळे नेटवर्क रिलेटेड इशू असेल तर प्रॉब्लेम सॉल्व होईल. आणि इंटरनेट व्यवस्थित चालेल.

4) कुकीज आणि कॅश क्लिअर करा

तुमच्या मोबाईल मध्ये असलेले वेगवेगळे ॲप्स आणि वेबसाईट वापरल्यामुळे कुकीज आणि कॅश जमा होतात. यामुळे देखील इंटरनेट स्लो चालते. अशावेळी तुम्ही कॅश आणि कुकीज क्लिअर करून तुमच्या इंटरनेट चे स्पीड वाढवू शकता.

5) सॉफ्टवेअर

तुमच्या मोबाईल मध्ये असलेले सॉफ्टवेअर जर जुने झाले असेल तर नेटवर्क इशू आणि बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. अशावेळी सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे आहे.