Vande Bharat Express : 2030 पर्यंत देशांमध्ये 800 वंदे भारत ट्रेन धावणार; काय आहे सरकारची योजना?

टाइम्स मराठी (Vande Bharat Express)। वंदे भारत एक्सप्रेस ही केंद्रातील मोदी सरकारने नव्याने आणलेली रेलेवं योजना आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या आणि त्यांचा प्रवास आरामदायी होवो यासाठी केंद्र सरकारने देशातील कानाकोपऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली आहे. मोदी सरकारची वंदे भारत एक्सप्रेस जनतेलाही चांगलीच पसंत पडली असून अनेक प्रवाशी यातून प्रवास करताना आपण पाहतोय. याच दरम्यान, केंद्रीय मंत्री आर के सिंह यांनी एक मोठं विधान केलं आहे. 2030 पर्यंत देशांमध्ये 800 वंदे भारत ट्रेन धावतील असं त्यांनी म्हंटल आहे,

   

2030 पर्यंत 800 वंदे भारत ट्रेन- (Vande Bharat Express)

शुक्रवारी मोदी सरकारच्या कामगिरीची गणना करताना आर के सिंह म्हणाले, सध्याचा भारत 2014 पूर्वीच्या तुलनेत पूर्णपणे वेगळा आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष असून आम्ही फक्त देशातील गरिबांसाठीच काम केलेले नसून देशाचा आधुनिकतेकडे वाटचाल करत विकास देखील केलेला आहे असं ते म्हणाले. 2030 पर्यंत देशांमध्ये 800 वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) आणण्याचा सरकारचा उद्देश असल्याचा देखील त्यांनी सांगितलं. सध्या वंदे भारत ट्रेन चे 25 सेट रुळावर असून या वर्षाच्या शेवटपर्यंत 150 सेवा म्हणजेच 75 ट्रेन सेट सुरू होण्याकडे सरकारचे लक्ष आहे.

घराघरात वीज पोचवली –

तसेच वीज क्षेत्रामध्ये भारताच्या प्रगती सोबतच पायाभूत सुविधांबाबत केंद्र सरकारच्या कामांची गणना त्यांनी केली. ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियामध्ये आपण जगात आघाडीवर आहोत. आम्ही देशाला विजेच्या तुटवड्या पासून दूर कडून प्रत्येक घरामध्ये वीज पोहोचवली आहे. आधुनिक पायाभूत सुविधांशिवाय आपला देश विकसित होऊ शकत नाही.

याशिवाय देशाच्या हवाई वाहतुकीबाबत सुद्धा त्यांनी मोदी सरकारच्या कामाची आकडेवारी जाहीर केली. आर के सिंग म्हणाले, यापूर्वी ज्या ठिकाणी ७४ विमानतळ होते, आता सरकारने ते १४८ केले आहेत. तसेच जिथे आधी विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या ६.१० कोटी होती, आज ती १३.६० कोटी झाली आहे.