Vande Bharat Express : पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेल्या रेल्वेगाडीला लागली आग? Video व्हायरल

टाइम्स मराठी । सोमवारी भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचला (Vande Bharat Express) आग लागल्याची घटना घडली आहे. कोचमध्ये बसवण्यात आलेल्या बॅटरीमुळे ही आग लागल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे उद्धाटन झाल्यानंतर या ट्रेनच्या अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. गेल्या काही महिन्यापूर्वीच पाळीव जनावरे रेल्वे ट्रॅकवर आल्यामुळे ट्रेनच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान पाहिला मिळाले. त्यानंतर सोमवारी आता ट्रेनच्या कोचला आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे.

   

कुरवई स्थानकाजवळील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरुन निजामुद्दीला जाताना काही वेळातच हा सर्व प्रकार घडला आहे. कुरवाई केथोरा स्थानकाजवळ गेल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसच्या (Vande Bharat Express) कोचला आग लागल्याचे सर्वांच्या निदर्शनात आले. त्यानंतर त्वरीत ट्रेनला थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले गेले. पुढे अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन ही आग विझवली. या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मात्र वारंवार घडत असलेल्या अपघातामुळे वंदे भारतने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Vande Bharat Express) –

सध्या घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आग विझवण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच सतत घटणाऱ्या या अपघातांची जबाबदारी कोण घेणार असा देखील सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत ट्रेनचे (Vande Bharat Express) उद्धाटन करण्यात आले होते. नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध भागात ट्रेन सुरु करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर वंदे भारत ट्रेन चर्चेचा विषय ठरली. ट्रेन सुरु होऊन थोडाच काळ गेला असताना ट्रेनच्या अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील नेते या मुद्द्यावरुन भाजपवर टीका करत आहेत.