VI चा ग्राहकांना झटका!! ‘हा’ स्वस्तात मस्त Recharge Plan केला बंद

टाइम्स मराठी । देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी VI (Vodafone Idea) ने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपला स्वस्तात मस्त आणि परवडणारा ९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. यापूर्वी कंपनीने आपल्या या सर्वात स्वस्त प्लॅनची ​​व्हॅलिडिटी कमी करून ग्राहकांना झटका दिला होता, आता तर ९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅनच बंद करण्यात आला आहे. परंतु कंपनीने हा निर्णय फक्त हरियाणा सर्कलपुरता घेतला आहे.

   

गेल्या काही दिवसांपूर्वी, Vodafone Idea ने आपल्या 99 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​व्हॅलिडिटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय फक्त मुंबई, गुजरात आणि दिल्ली सर्कलसाठी घेण्यात आला होता. मात्र आता तर कंपनीने हरियाणा सर्कलसाठी Vi चा 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसू शकतो.

खरं तर कंपनीने आपला 99 रुपयांचा परवडणारा आणि स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन का बंद केला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याबतीत VI ने म्हंटल कि, प्रत्येक यूजर मागे सरासरी महसूल वाढवणे हेच यामागील मुख्य कारण आणि हेतू आहे. सध्या तरी कंपनीने हा प्लॅन हरियाना मध्ये बंद केला आहे. महाराष्ट्रात असा कोणताही प्लॅन बंद करण्यात आलेला नाही, त्यामुळे राज्यातील VI ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही.