Vida V1 Plus अपडेटेड फीचर्ससह लाँच; पहा किंमत किती?

टाइम्स मराठी । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Hero ने आपली Vida V1 Plus ही इलेक्ट्रिक स्कुटर अपडेटेड फीचर्ससह लाँच केली आहे. स्कुटरवर देण्यात आलेल्या सबसिडी नंतर Vida V1 Plus ची एक्स शोरूम किंमत 97,800 रुपये ठेवण्यात आली आहे. भारतीय बाजारात Ather 450S, Ola S1 Air सारख्या टॉपच्या इलेक्ट्रिक स्कुटरला टक्कर देईल. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स, रेंज याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

   

Vida V1 Plus ही इलेक्ट्रिक स्कुटर 1.72 kWh बॅटरी पॅकसह लाँच करण्यात आली आहे. ही बॅटरी रिमूव्हल बॅटरी म्हणजे काढता येण्यासारखे बॅटरी बसवण्यात आली आहे. हि बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास 15 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हिरोची ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 100 किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करू शकते. तसेच यावेळी स्कुटरचे टॉप स्पीड 80 किमी प्रतितास इतकं राहते. हि इलेक्ट्रिक स्कुटर अवघ्या 3.4 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग वाढवू शकते असा दावा कंपनीने केला आहे. Vida V1 Plus मध्ये इको, राइड आणि स्पोर्ट असे ३ रायडींग मोड देण्यात आले आहेत.

गाडीच्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये 7-इंचाची टीएफटी स्क्रीन आहे, जी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणून काम करते. तसेच तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते. याशिवाय टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, जिओफेन्स, ट्रॅक माय बाईक, रिमोट इमोबिलायझेशन, व्हेईकल डायग्नोस्टिक्स, अँटी थेफ्ट अलार्म, फॉलो-मी होम हेडलॅम्प, कीलेस एंट्री, इलेक्ट्रॉनिक सीट आणि हँडल लॉक, क्रूझ कंट्रोल यांसारखे फीचर्स सुद्धा देण्यात आले आहेत. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर 5 वर्षे किंवा 50,000 किलोमीटरची वॉरंटी देत आहे तर बॅटरीवर 3 वर्षे आणि 30,000 किमीची वॉरंटी आहे.