टाइम्स मराठी | मुंबईच्या लोकल ट्रेनने (Mumbai Local) दररोज लाखोंपेक्षा जास्त नागरिक प्रवास करीत असतात. याच लोकलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई लोकल ट्रेन मध्ये सहा मुलं आणि एक मुलगी चक्क ड्रग्जचे (Drug) सेवन करताना सापडले आहेत. या मुलांच्या ग्रुपचा ड्रग्ज घेतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे. ज्यामुळे हा प्रकार सुरू असताना पोलीस प्रशासन काय करत होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर अनेकांनी या 6 मुलांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसत आहे की, रात्री उशिराच्या वेळेस ६ मुलं आणि १ मुलगी असलेला ग्रुप ड्रग्सचे सेवन करत ट्रेनमध्ये बसले आहेत. तर इतर प्रवासी देखील यावेळी ट्रेनमध्ये बसलेले आहेत. परंतु कोणीच त्यांना हे कृत्य करण्यापासून थांबवताना दिसत नाहीये. या मुलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनावर टीका करण्यात येत आहे. रोज लाखो नागरिक लोकलने प्रवास करत असताना असे कृत्य घडणे धक्कादायक आहे.
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ड्रग्स घेणाऱ्या मुलांचा व्हिडिओ ट्विटवर मुंबई न्यूजने शेअर केला आहे. त्यामुळे या गोष्टीवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर मुंबई लोकल ट्रेन मध्ये असे कृत्य घडत असताना नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबई लोकल ट्रेनमधून एका मुलीने उडी मारल्याची घटना समोर आली होती. लोकलमध्ये मुलगी एकटी असल्यामुळे एका व्यक्तीने लूटमारीचा प्रयत्न करत तिच्यावर हल्ला केला होता.
इतकेच नव्हे तर, यापूर्वी मुंबई लोकल ट्रेनमध्ये अशा अनेक नागरिकांसोबत धक्कादायक घटना घडल्या आहेत. ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता पुन्हा एकदा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये उघडपणे मुलं ड्रग्ज घेताना समोर आले आहेत. या गोष्टींवर जर आत्ताच कारवाई करण्यात आले नाही तर अशा घटनांमध्ये वाढ होईल असे प्रवाश्यांचे म्हणणे आहे.