कमी पैशात मिळतोय VIP नंबर; अशाप्रकारे करा अर्ज

टाइम्स मराठी । आज कालच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचा शौक असतो. आणि ते त्यांचा शौक पूर्ण देखील करतात. तुम्ही बघितलं असेल की बरेच जण तुटलेल्या वस्तू जमा करतात, होम क्राफ्ट बनवतात. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना फक्त गाड्यांचेच नाही तर मोबाईलचा VIP नंबर जमा करण्याचा शॉक असतो. यासाठी ते बरेच पैसे मोजतात. काहीजण तर त्यांचा लकी नंबर VIP नंबर मध्ये जोडतात. जर तुम्हाला देखील अशाच प्रकारे VIP नंबरचा शौक असेल तर तुम्ही फक्त 1000 रुपयांमध्ये हा व्हीआयपी नंबर मिळवू शकता.

   

MoRTH वेबसाईट वर करावं लागेल रेजिस्ट्रेशन –

जर तुम्हाला व्हीआयपी नंबर प्लेट हवी असेल तर सर्वात अगोदर रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला पब्लिक युजर म्हणून नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा आवडता नंबर निवडून त्याला रिझर्व्ह करावा लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील. नोंदणी शुल्क राज्यानुसार वेगेवेगळे असू शकते. सध्या दिल्लीमध्ये ते 1000 रुपये आहे

गाडीच्या नंबर प्लेटसाठी ट्रान्सपोर्ट प्राधिकरण हे प्रत्येक अल्फाबेटच्या सिरीज मध्ये 0001 ते 9999 यामधील संख्याना व्हीआयपी नंबर म्हंटल जाते. त्यांना बऱ्याच वेगवेगळ्या कॅटेगिरी मधून वेगळं करण्यात येतं. आणि त्यांच्या किमती देखील वेगळ्या असतात. जर तुम्हाला हा नंबर खरेदी करायचा असेल तर तो तुम्हाला रिझर्व्ह करावा लागेल. त्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर तुमचा आवडता नंबर बुक करा. त्यानंतर तुम्हाला फीस जमा करावी लागेल. त्यानंतर या नंबरचा लिलाव होईल. या लिलावात सहभागी होऊन तुम्ही या लिलाव जिंकला तर तो नंबर तुमच्या नावावर नोंदवला जाईल.