Bike वरून स्टंट करणं पडलं महागात!! तरुणी झाली अपघाताची शिकार (Video)

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये लहान मुलांचे टॅलेंट, कॉमेडी, ऍक्टिन्ग, डान्स आणि काही स्टंट व्हायरल होत असतात. त्याचबरोबर सोशल मीडियावर आपला व्हिडिओ व्हायरल व्हावा यासाठी बरेच मुलं- मुली वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करतात. ज्यामुळे त्यांचा जीव देखील जाण्याची शक्यता असते. परंतु याचा विचार न करता ते चित्र विचित्र स्टंट करत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या विडिओ मध्ये Bike वरून स्टंट करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं असून ती अपघाताची शिकार ठरली आहे.

   

या व्हिडिओमध्ये जीवाची पर्वा न करता एक मुलगी बाईकच्या समोरच्या चाकावर उभी राहून सेल्फी घेत आहे. आणि बाईकस्वार स्टंट करत मागील एकाच चाकावर गाडी चालवत आहे. म्हणजेच या बाईक स्वाराच्या बाईकचे समोरचे चाक हवेत आहे. हा स्टंट करत असताना समोरच्या साईडने येणारी टू व्हीलर स्टंट करणाऱ्या बाईकला धडकते आणि स्टंट करत असलेल्या मुलाचा तोल जाऊन सेल्फी घेणारी मुलगी आणि बाईक स्वार खाली पडल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. यानंतर या मुलीला दुखापत एवढी गंभीर झाली की तिचे हात पाय थरथरताना दिसत आहेत. यावेळी बरेच लोक साईडला उभे राहून गंमत पाहत होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला 7 लाख लोकांनी आतापर्यंत पाहिलेलं असून बऱ्याच लोकांनी कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया दिली. या वायरल झालेल्या व्हिडिओच्या खाली वेगळ्याच लँग्वेज मध्ये काहीतरी लिहिण्यात आलेलं आहे पण हा व्हिडिओ बघून त्या मुलीचा मृत्यू झाला असावा असं वाटत आहे.