विराट कोहली एका Instagram Post च्या माध्यमातून कमवतो ‘इतके’ कोटी; आकडा ऐकून वेड लागेल

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज काल बरेच जण ऍक्टिव्ह दिसत आहे. यासोबतच सोशल मीडिया हे कमाईचे साधन देखील बनले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये असलेल्या Whatsapp, Instagram, Facebook, Youtube च्या माध्यमातून बरेच जण घरबसल्या पैसे कमवतात. त्याचबरोबर इंस्टाग्राम वर देखील फॉलोवर्स जास्त असल्यास लाखो रुपयांपर्यंत पेमेंट मिळू शकते. आपल्या भारतात क्रिकेटपटू आणि अभिनेता अभिनेत्री यांचे सोशल मीडियावर करोडो फॉलोवर्स आहेत. या माध्यमातून हे क्रिकेटपटू किंवा फेमस अभिनेता बंपर कमाई करत असतात. असाच एक क्रिकेटपटू सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणीही नसून भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा आहे.

   

स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा भारतासोबतच जगात देखील प्रसिद्ध आहे. विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूच्या यादीत ओळखला जातो . इंस्टाग्रामवर विराट कोहलीचे प्रचंड फॉलोवर्स आहेत. कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, तो पत्नी अनुष्का शर्मासोबत त्याच्या कुटुंबाचीआणि आयुष्यातील निवडक क्षणांचे फोटो शेअर करत असतो. इंस्टाग्राम वर फॉलोवर जास्त असल्यास यामधून त्याची कमाई सुद्धा जास्त होते. ही कमाई दाखवणारी हॉपर instagram रिच लिस्ट नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. या हॉपर रिच लिस्टच्या माध्यमातून सर्वात जास्त कमाई करणाऱ्या लोकांची माहिती दिली जाते.

जगातील तिसरा खेळाडू बनला विराट –

हॉपर instagram रिच लिस्ट 2023 च्या रिपोर्टनुसार विराट कोहलीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 25.52 कोटी असून एका पोस्टच्या माध्यमातून विराट तब्बल 11.45 कोटी रुपये कमवतो. त्यामुळे क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतरचा तो इंस्टाग्रामवरील तिसरा सर्वात श्रीमंत ऍथलीट आहे. यापूर्वी 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या हॉपर रिच लिस्टमध्ये विराट19 वा सर्वात जास्त पैसे कमवणारा क्रिकेटपटू बनला होता. त्यावेळी विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्ट साठी 5 कोटी रुपये घेत होता. आता याचे प्रमाण दुपट्टीने वाढले आहे. दरम्यान, इंस्टाग्राम वर कंटेंटच्या सहाय्याने रिल्स बनवून, instagram वर फॉलोवर्स ची संख्या वाढवून बरेच जण पैसे कमवू लागले आहेत. इंस्टाग्राम वर जर तुमचे एक दशलक्ष फॉलोवर्स असतील तर तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये मिळू शकतात. हीच फॉलोवरची संख्या दहा दशलक्ष एवढी असेल तर तुम्हाला 15 ते 20 लाख रुपये मिळू शकतात.